बुध पूजन
बुध हा हिरव्या रंगाचा चमकणारा ग्रह आहे. हा सूर्याच्या सर्वात जवळ आहे. बुध हा ग्रह वाक्चातुर्य, विद्या-अध्ययन तसेच व्यंग असणार्यांना सुद्धा प्रभावित करणारा आहे.
बुध शुभस्थानात असेल तर तो यशस्वी वकील बनवण्यास सहायक ठरतो. परंतु जर अशुभ स्थानात असेल तर व्यक्तीला शंकेखोर तसेच रोगी बनवतो. बुध हा ग्रह सूर्य मालिकेत ईशान्येच्या कोनात स्थित आहे. बुधाच्या अनुकुलतेसाठी भगवतीची साधना प्रभावी ठरते.
आवाहन मंत्र
हिरव्या रंगाचे फूल आणि हिरव्या रंगाचे तांदूळ हातात घेऊन खालील आवाहन मंत्र म्हणावा.
प्रियंगुकलिका भासं रूपेणाप्रतिमं बुधम् ।
सौम्यं सौम्यगुणोपेतं बुधमावाहयाम्यहम् ॥
स्थापना मंत्र
नंतर खालील मंत्र म्हणून बुधाची स्थापना करावी.
ॐ भूर्भुवः स्वः बुध इहागच्छ इहतिष्ठ ।
ॐ बुधाय नमः ॥
हिरव्या रंगाचे फूल आणि हिरव्या रंगाचे तांद्ळ नवग्रह मंडळात असलेल्या बुध ग्रहाच्या स्थानावर सोडावे.
ध्यान मंत्र
खालील मंत्र म्हणून बुधाचे ध्यान करावे.
ॐ उद्बुध्यस्वाग्ने प्रतिजागृहि त्वभिष्टापूर्ते स असजेथामयं च ।
अमिन्त्सधस्थे अध्युत्तरस्मिन् विश्वेदेवा दण्डधरश्च हारो ।
वर्माग्निधृक्सोमसुतो सदा मे सिंहात्रिरूढो वरदो बुधो मे ॥
बुध मंत्र
खाली बुधाचा मंत्र दिलेला आहे. या मंत्राची संख्या ९००० असते.
ॐ बुं बुधाय नमः ।
ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः ।
बुध यंत्र
यंत्राच्या अकांची बेरीज कुठुनही केली तरी २४ इतकीच येते. बुधाचे यंत्र कोणत्याही महिन्यात शुक्लपक्षात येणार्या पहिल्या बुधवारी डाळिंबाची काडी केशराच्या शाईत बुडवून भुर्जपत्रावर लिहावे. नंतर यंत्राला धूप, दीप दाखवून तसेच हिरव्या रंगाचे फूल वाहून
ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः ।
या मंत्राचा जप करून यंत्र सोन्याच्या ताईता मध्ये किंवा हिरव्या वस्त्रामध्ये धारण करावे.