सूर्यपूजन
सौर मंडलात सूर्याचे स्थान मध्यभागी असून सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात.
सूर्याची पूजा-आराधना रविवारी सकाळी, पहाटे पहाटे केली जाते. त्याने शारीरिक आणि मानसिक विकास होतो. पूजेनंतर सूर्यदान सामग्री करावी. सूर्याचा उपवास करावा आणि दुपारी काहीतरी गोड पदार्थ खाऊन उपवास सोडावा. त्यानंतर मात्र दिवसभर काहीही खाऊ नये. दुसरे दिवशी सोमवारी सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन व्रत पूर्ण करावे.
आव्हान मंत्र
लाल तांदूळ अथवा लाल फूल हातात घेऊन आवाहन करावे.
ॐ आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्न मृतंमर्त्यंच ।
हिरण्येन सविता रथेना देवो याति भूवनानि पश्यन् ॥
हातात लाल फूल आणि लाल रंगाचे तांदूळ घेऊन स्थापना मंत्र म्हणावा.
स्थापना मंत्र
ॐ विश्वानिदेर्द सवितर्दरितानि परासुव यद्भद्रं तन्न आसुव ।
ॐ भूभुर्वः स्वः कलिंग देशोद्भव काश्यप गोत्र रक्तवर्णाभ सूर्य इहागच्छ इहतिष्ठ सूर्याय नमः श्री सूर्यम् वाहयामि स्थापयामि ॥
लाल फूल किंवा लाल रंगाचे तांदूळ नवग्रहाची जी पूजा मांडलेली असते तिथे मध्यभागी सूर्यस्थानावर सोडावेत.
ध्यान मंत्र
खालील मंत्र म्हणून सूर्याचे ध्यान करावे.
ॐ जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाधुतिम् ।
तमोऽरिं सर्वपापघ्न सूर्यमावाहयाम्यहम् ॥
सूर्य मंत्र
सूर्यदेवाचा बीजमंत्र खालील प्रमाणे - या मंत्राची जपसंख्या - ७००० आहे.
ॐ सूं सूर्याय नमः ।
ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः ।
सूर्य यंत्र -
यंत्राच्या अंकांची बेरीज कशीही केली तरी १५ इतकीच येते. खोणत्याही महिन्यातील शुक्लपक्षात येणार्या पहिल्या रविवारी रवि पुष्य असताना सुर्योदयानंतर डाळींबाची काडी अष्ट्गंधाच्या शाईत बुडवून भुर्जपत्रावर लिहावे. नंतर यंत्राला धूप दीप आणि लाल सुगंधित फुले वाहून खालील मंत्र म्हणावा.
ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः ।
नंतर ते यंत्र सोन्याच्या ताईतामध्ये किंवा काळ्या वस्त्रात बांधून धारण करावे.