मंगळ पूजन
सूर्य मालिकेत सूर्याच्या दक्षिणेकडे मंगळाचे स्थान असते. हा साहस प्रदान करणारा आहे. मंगळ शुभस्थानात असल्यास धन, संपत्ती देतो. हनुमानाची आराधना केल्यास हा ग्रह अनुकूल होतो. वैवाहिक जीवन, पुत्र सुखा करिता मंगळाची साधना लाभदायी असते. ही आराधना मंगळवारीच करतात. उपवासात मीठ पूर्ण वर्ज्य करावे. तसेच एकदाच भोजन करावे. सूर्यास्तानंतर भोजन करू नये. बुधवारी सूर्याला अर्घ्य देऊन व्रताची सांगता करावी.
आवाहन मंत्र
लाल फूल आणि लाल तांदूळ हातात घेऊन खालील मंत्र म्हणून मंगळाचे आवाहन करावे.
धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् ।
कुमारं शक्तिहस्तं च भौममावाहयाम्यहम् ॥
स्थापना मंत्र
त्यानंतर खालील मंत्र म्हणून मंगळाची स्थापना करावी.
ॐ अग्निमूर्धा दिवःककुत्पतिः अयम् ।
आपा रेता असि जिन्वति ॐ भौमाय नमः ॥
लाल फूल आणि लाल रंगाचे तांदूळ घेऊन नवग्रह मंडळात मंगळाच्या स्थानावर सोडावे.
ध्यान मंत्र
खालील मंत्र म्हणून मंगळाचे ध्यान करावे.
अंगारक महाभाग भगवन् भक्तवत्सल ।
त्वां नमामि ममाऽशेषमृणमाशु विनाशय ॥
मंगळाचा मंत्र
मंगळाच्या मंत्राची जपसंख्या १००० आहे. मंगळाचा मंत्र खाली दिलेला आहे.
ॐ अं अंगारकाय नमः ।
ॐ क्रां क्रीं कौं सः भौमाय नमः ।
मंगळ यंत्र
यंत्राच्या अकांची बेरीज कुठुनही केली तरी २१ इतकीच येते. कोणत्याही महिन्याच्या शुक्लपक्षात पहिल्या मंगळवारी भुर्जपत्रावर तांब्याच्या लेखणीने अष्टगंधाच्या शाईत बुडवून लिहावे. नंतर धूप, दीप, सुगंधित लालपुष्प त्या यंत्रावर वाहून
ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः ।
हा मंत्र म्हणून ते यंत्र तांब्याच्या ताईतात किंवा लाल वस्त्रात घालून धारण करावे.