दोन तीन बैलांच्या, लागल्या ढुशी बाई लागल्या ढुशी
त्यांत माझी करंगळि, गमावलि कशी बाई गमावलि कशी
धाकल्या दिराला, गवसलि कशी बाई गवसलि कशी
धाकल्या दिराचं, काय मत झालं बाई काय मत झालं
सासू सुगरीणिला, सांगत गेल बाई सांगत गेल
सासू सुगरीणिचं, काय मत झालं बाई काय मत झालं
दोन तीन चाबूक, उडविले बाई उडवीले
दोन तीन चाबूक , तारातूर बाई तारातूर
माझं माहेर, पंढरपूर बाई पंढरपूर
माझं आजूळ, रत्नांगिरी बाई रत्नांगिरी
रत्नांगिरीच्या, टाक्यावरि बाई टाक्यावरी
शेला झुलतो, ढाप्यावरि बाई ढाप्यावरी
नाग डुलतो, चांफ्यावरि बाई चांफ्यावरी