करड्या करड्या का का कू, का का कू
कुणाच्या बैलाला घाला जूं घाला जूं
घाल आमच्या मदना मदना
मदन आमुचां गुणाचा गुणाचा
बैलापाठीं फुलाचा फुलाचा
फुलबा फुलबा ढेलजत जा ढेलजत जा
पाण्याच्या वाटेनं खेळत जा खेळत जा
पाण्याच्या वाटेला ढोल ग ढोल ग
किडकं आंब घावल ग घावल ग
किडकं आंब गोमाशा गोमाशा
गोमास काजाळ लिवूं ग लिवूं ग
हिरव्या पाण्याला जाऊं ग जाऊं ग
हिरवं पाणी गाईचं ग गाईचं ग
आमच्या नागोबाला फूल जाईचं ग जाईचं