नागपंचमी - श्रावण हंकारी हंकारी कां...
श्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे
श्रावण हंकारी हंकारी
कांडुन कुटून करा पंचमी
गणपतीची सोंड वाकडी
अग या गणपतीचे लाडू
बाई या लक्ष्मीपुढें वाडू
अग या लक्ष्मीच्या गाठ्या
बाई या पित्रांनीं केल्या दाट्या
अग या पित्राचें ताट
दसरा आला गजघाट
अग या दसर्याच्या माळा
दिवाळी आली काळूकाळा
अग या दिवाळीचा दिवा
सटीनं घेतला धावा
अग या सटीचा रोडगा
संक्रातीनं घातला डगा
अग या संक्रांतीचं सुगड
या ग शिमग्याला बिगी धाड
शिमग्याचा ग गुलाल
पाडवा बाई दलाल
अग पाडव्याची गुढी
आखितीनं मारली उडी
आखितीचा आंबरस
सर्व सणा निचींत बस
N/A
References : N/A
Last Updated : December 24, 2007

TOP