हळदकुंकू वहायाला ताज्या लाह्या वेचायाला
चल ग सये वारुळाला चल ग सये वारुळाला
या ग या गडयीनी या ग या मैतरिणी
तेल्या तांबूळ्याच्या बाई वाण्या बामणाच्या बाई
जमूनिया सार्याजणी जाऊं बाई न्हवणा
जिथं पाय ठेवूं बाई तिथं उठल् दौणा
चल ग सये वारुळाला चल ग सये वारुळाला
नदीच्या पल्याड ग सोनाराचं हाई घर
तिथं बाई उतरला दामाजी ग सोनार
त्यानं बाई घडविल साखळ्यांचा जोड
लेग लेग लेग लेकी लेग लेग लेग लेकी
कशी लेवूं सांग दादा कशी लेवूं सांग बाबा
घरीं माझ्या भावजया करतील हेवा दावा
घरीं माझ्या नंदा जावा करतील हेवा दावा
चल ग सये वारुळाला चल ग सये वारुळाला
नदीच्या पल्याड ग दामाजी सोनार
त्यानं बाई घडविल बांगडिचा जोड
लेग लेग लेग लेकी कशी लेवूं सांग दादा
घरीं माझ्या भावजया करतील हेवा दावा
चल ग सये वारुळाला चल ग सये वारुळाला...