मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक १५ वा

एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


इन्द्रियाणि मनो बुद्धिः सह वैकारिकैर्नृप ।

प्रविशन्ति ह्यहंकारं स्वगुणरैहमात्मनि ॥१५॥

आकाशाचा जो शब्दगुण । तो प्रळयकाळु गिळी संपूर्ण ।

तंव क्षोभला तामसभिमान । तो करी प्राशन गगनाचें ॥९५॥

दश इंद्रियांचा गोंदळा । राजसाभिमानीं रिघाला ।

चित्तचतुष्टयाचा मेळा । तोही प्रवेशला सात्त्विकाभिमानीं ॥९६॥

इंद्रियअधिष्ठात्रीं दैवतें । तींही मिळोनियां समस्तें ।

प्रवेशलीं सात्त्विकातें । जाण निश्चितें नृपनाथा ॥९७॥

ते तिनी अहंकार त्रिगुणेंसीं । प्रवेशती महत्तत्त्वासीं ।

महत्तत्त्व मिळे मायेसी । जेवीं कन्या संततीसीं माहेरा ये ॥९८॥

जेवीं कुकडीचीं पिलीं । कुकडी पांखांतळीं घाली ।

मग ते स्वयें दिसे एकली । तेवीं माया उरली कल्पांतीं ॥९९॥

एवं उत्पत्तिस्थितिप्रळयांत । त्रिविध भागें दाविली येथ ।

ते गुणमयी माया निश्चित । मिथ्याभूत आभासे ॥२००॥

जेवीं लेंकुरें खेळतां खेळासी । दिवसा म्हणती जाहली निशी ।

तेवींचि पूर्णस्वरुपापाशीं । देखती मायेसी त्रिविध कल्पना ॥१॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP