मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक ४९ वा

एकनाथी भागवत - श्लोक ४९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


शुचिः संमुखमासीनः प्राणसंयमनादिभिः ।

पिण्डं विशोध्य संन्यासकृतरक्षोऽर्चयेद्धरिम् ॥४९॥

विध्युक्त करितां संध्यास्नान । तेथचि आहे ब्रह्मज्ञान ।

आचमनीं होय हरिरूप आपण । हें नेणोनि अज्ञान आगमीं भरती ॥८१३॥

केशवादि नामीं जाण । अंगप्रत्यंगीं न्यासितां पूर्ण ।

तेव्हां हरिरुप होय आपण । हें नेणोनि अज्ञान आगमीं भरती ॥८१४॥

करूनि आगमोक्त संध्यास्नान । मूर्तीपासीं ये‍ऊन जाण ।

संमुख घालावें आसन । चैलाजिनकुशयुक्त ॥८१५॥

रेचक-पूरक-कुंभकें जाण । प्रणायामें प्राणसंयमन ।

भूतशुद्धयादिकीं जाण । शरीरशोधन करावें ॥८१६॥

भूतविलय भूतशुद्धी । प्राणप्रतिष्ठा पिंडादिशुद्धी ।

मूळमंत्रें न्यास प्रबुद्धीं । गुरुदीक्षाविधी विध्युक्त कीजे ॥८१७॥

हृदय कवच शिखा शिर । नेत्रे अस्त्रादि फट्‌कार ।

एवंविधान अनुकार । आगमोक्तप्रकार करावे न्यास ॥८१८॥

यापरी मूळमंत्रदीक्षा । करोनि दिग्बंधादि संरक्षा ।

मग मूर्तिपूजनपक्षा । नृपाध्यक्षा अवधारीं ॥८१९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP