अध्याय १
|| श्री गणेशाय नम: ॥ ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ श्री गुरुभ्यो नम: ॥
ओं नमोजी आद्यपुरुषा ॥ श्रीअनंता लक्ष्मी विलासा ॥ कैवल्यदानी परमंहसा ॥ पुरुषोत्तमा तुं ॥१॥
तुं सच्चिदांनंदघन ॥ बाह्याभ्यंतरीं परिपुर्ण ॥ तुं अचेतनासी चतन ॥ ज्ञानरुपा ॥२॥
जयजयाजी मंगळधामा ॥ परमपुरुषा अत्मयारामा ॥ भुतमात्रीं पुरुषोत्तमा ॥ तुंचि एक ॥३॥
जयजयाजी करुणाकरा ॥ भक्तवत्सला वज्रपंजरा ॥ त्रिजगतीत अदिअंकुरा ॥ मुकुंदा तुं ॥४॥
जयजयाजी अजरामरा ॥ गुणरहिता अक्षरा ॥ कमलकलिकेसी भ्रमरा ॥ भोगिता तुं ॥५॥
जयजयाजी ओंकारबीजा ॥ विश्वव्यापका तुं सहजा ॥ कैवल्यदानाचिया भोजा ॥ तुंचि एक ॥६॥
जयजय तुं ज्योतिलिंगा ॥ परमपुरुषा महाभागा ॥ अजरामरा अभंगा ॥ जुनाट तुं ॥७॥
जयजयाजी महासिद्घा ॥ आदिईश्वरा शुद्घबुद्घा ॥ भवभयाचिया संबंधा ॥ वेगळा तुं ॥८॥
तुं परम परमानंद ॥ परमात्मा विश्वकंद ॥ तुं चराचर अभेद ॥ निरंतरीं ॥९॥
तुं प्रळयाचा अंत आदी ॥ तुं ज्ञानमुळ सर्वसिद्घी ॥ सर्वज्ञान तत्वबुद्घी ॥ तुं नृसिंहा ॥१०॥
तुं सर्वज्ञांनाचा निधी ॥ सर्व देवामाजी उदधी ॥ परि सर्वरचनेची उपाधी ॥ नाहीं तुज ॥११॥
तुं व्यापोने चराचरी ॥ अलिप्त अससी भुतमात्रीं ॥ जेवी जळ पद्मिनीपत्रीं ॥ नलिपेची ॥१२॥
तुं जीवनाचे जीवन ॥ तुं ज्ञानाचे अंजन ॥ मोक्षपदाचें भुवन ॥ तुंचि एक ॥१३॥
तुं मनमोक्षाचें सुमन ॥ कीं तत्वदीक्षादि साधन ॥ तुं वेदगर्भीचे अंजन ॥ नारायण ॥१४॥
जयजयाजी भक्तवत्सला ॥ कृपाळुवा महाशीळा ॥ धर्मश्रुतिप्रतिपाळा ॥ गोविंदां तुं ॥१५॥
आतां असो हें स्तवन ॥ मापें केवीं मोजवें गगन ॥ श्रुतीनीं केलें असे मौन ॥ नुणती तुज ॥१६॥
स्वर्गमृत्युपाताळगतु ॥ ज्याचेनि आधारें सर्वतंतु ॥ तेधवां ब्रह्याही अशकु ॥ वानितां तुज ॥१७॥
बोबडे बोले बाळक ॥ परी माता मानी कौतुक ॥ कीं लिंगपुजाया जाय रंक ॥ आपुले शक्तीं ॥१८॥
ह्यणवुनि नुचिं मातापिता ॥ ब्रह्या आणि कुळदेवता ॥ तुचिं सर्वशास्त्रांचा श्रोता ॥ गुरुशिष्य तुंची ॥१९॥
तुझें केलिया नामस्मरण ॥ तें सकळकार्याचें साधन ॥ जैसें तरुमुळीचें सिंचन ॥ पोशी पल्लवातें ॥२०॥
आतां असो हे विनवंणी ॥ जे तुं सर्वज्ञ चिंतामणी ॥ तरी रिवोनि अंत:करणी ॥ बोलवीं मज ॥२१॥
जैसा बाण लक्षा वागवी वीरु ॥ कीं मार्ग दावी दुतहेरु ॥ तैसा बोलवी कल्पतरु ॥ ग्रंथराज हा ॥२२॥
तरी तुज करुनि नमस्कारु ॥ पुढें बोलुं कल्पतरु ॥ तो तुझाचि गुणविस्तारु ॥ नामघोषाचा ॥२३॥
असो नमिला श्रीगणेश ॥ कुळदेवी तुं देई सौरस ॥ आणि नमिला गुरुव्यास ॥ वाल्मिकमुनी ॥२४॥
आतां नमुं संत श्रोता ॥ जो परलोकाची साधना ॥ क्षीरामृताची विवंचना ॥ ज्यांचिये मुखीं ॥२६॥
मागें जाहला स्तबक चौथा ॥ आतां पंचमस्तबकाची व्यवस्था ॥ ते पुर्णकरावी अनंता ॥ कृपा करोनी ॥२७॥
अवधान द्यावें जी श्रोतां ॥ श्रवणी ऎकावी हरिकथा ॥ जे भवरोगदरिद्रव्यथा ॥ करी दुर ॥२८॥
जैसें क्षीरगंर्भीचें घृत ॥ तैसें हें सर्वपुराणाचें मत ॥ कीं मेळवी अमृतीं अमृत ॥ कपिला जैसी ॥२९॥
नानापुष्पांचा आणोनि रस ॥ भक्षिका मेळवीं अंशें अंश ॥ तैसा बोलेन नवरस ॥ ग्रंथराज हा ॥३०॥
अठरा पुराणींचें मत ॥ जें अभ्यासवचनें असे सत्य ॥ तें श्रोतया श्रवणीं अमृत ॥ घालुं आतां ॥३१॥
हे भाषारत्न म-हाठी ॥ ऋषिवाक्यावरी देवोनि दृष्टी ॥ नानाकथांची उघडे पेटी ॥ कल्पतरु हा ॥३२॥
जन्मेजय राजा भारती ॥ वैशंपायन वेदमुर्ती ॥ या उभयतांची संगती ॥ घडली येथें ॥३३॥
या उभयतांचा संवादु ॥ तो हरिकथेचा रससिंधु ॥ कीं विस्तारिला आमोदु ॥ श्रोतयांसी ॥३४॥
श्रोतीं व्हावें सावधान ॥ वारावे वाजंट दुर्जन ॥ कथेंचे पावलें अनुसंधान ॥ ह्यणे कृष्णयाज्ञवल्की ॥३५॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ मंगलाचरणप्रकारु ॥ प्रथमोsध्यायी सांगितला ॥३६॥