कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय २

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


|| श्रीगणेशाय नम: ॥

जन्मेजयराजा भारती ॥ वैंशपायन वेदमुर्ती ॥ या दोहीची सुखसंगती ॥ घडली येथें ॥ १॥

या दोहीचा संवाद ॥ परमसुखाचा आनंद ॥ तो ऎका जी अनुवाद ॥ हरिकथेचा ॥२॥

जैसा गगनीं सुधांश ॥ कळा मेळवी अशेष ॥ नातरी सागरीं होय सौरस ॥ आपगा जैसा ॥३॥

कनककोंदणाचा अलंकार ॥ नवरत्नीं घेइजे बिढार ॥ कर्ता घडी अरुवार ॥ सदैवा जैसा ॥४॥

नानाद्घीपीचें अमौल्य खडे ॥ पदकीं भासती उघडे ॥ तैसीं उदेलीं कथाजुंबाडें ॥ कल्पद्रुमी या ॥५॥

आतां असो हे वित्पत्ती ॥ जन्मेहय पुसे पुढती ॥ वैशंपायनऋपीप्रती ॥ मनोधर्मे करुनी ॥६॥

ह्यणे ऎका जी वेदमुर्ती ॥ काहीं आठवलें असे चित्ती ॥ कीं सत्यभामेसी अतिप्रीती ॥ यादवदेवा ॥७॥

ते महागर्वाची सुंदरी ॥ दानीं दिधला मुरारी ॥ तरी येवढी काय पां थोरी ॥ तिचिये पुण्याची ॥८॥

असोनि सोळासहस्त्र कांता ॥ रुक्मिणी मुख्य पतिव्रता ॥ त्याहोनिं तिचें गोपिनाथा ॥ थोर आर्त ॥९॥

येवढें पुणु कायजी मुनी ॥ जे भ्रतार दीधला दानी ॥ जया त्रिभुवनाचिया मणी ॥ कुरवंडी कीजे ॥१०॥

मग ह्यणे वैशंपायन ॥ राया बरवा केलासि प्रश्न ॥ जेणें सुखावे अंत:करण ॥ वैष्णवाचें ॥११॥

तरी कोणेएके अवसरीं ॥ यादवराव मंचकावरी ॥ तेथें सत्यभामा नारी ॥ विडिया देत ॥१२॥

तंव संभमे पुरुषोत्तमा ॥ पुसे आदरें सत्यभामा ॥ ह्यणे मी जाहले वल्लभा तुह्याम ॥ कैसेनि प्राप्त ॥१३॥

जो तुं न लाभसी सिद्घां ॥ तो तुं वागसी माझे शब्दा ॥ येवढें काय पुण्य मुकुंदा ॥ जोडलें मज ॥१४॥

मग देवें खुणाविली वामनेत्रीं ॥ ह्यणे या सकळ उभ्या सुंदरी ॥ तयां देखता निर्धारीं ॥ सांगो न ये ॥१५॥

ऎसें ह्यणोनि उठिला श्रीपती ॥ हातीं धरोनियां युवती ॥ पारिजारक द्रुमाप्रती ॥ आलीं दोघें ॥१६॥

तळीं घालोनि शेजवट ॥ वरी बैसला वैकुंठपीठ ॥ मग वाचिला ग्रहणपटा ॥ सत्यभामेचा ॥१७॥

श्रीकृष्ण ह्यणे हो कामिनी ॥ तुं जन्मांतरीं होतीस द्घिजपत्नी ॥ तेथें सुकृत केलें ह्यणोनी ॥ पावलीस मज ॥१८॥

री देवश्रमा नामें ब्राह्यण ॥ होता सुर्यवंशीचा निजगन ॥ वेदशास्त्रीं विद्या संपुर्ण ॥ महाशीळ तो ॥१९॥

तया पंचयज्ञांचा आदर ॥ परि जाहला नहें कुमर ॥ तुं एकलीच निर्धार ॥ कन्या तयातें ॥२०॥

ऎसें जंव वर्तत असतां ॥ तंव निमाली तुझी माता ॥ चंद्रनामा शिष्य होता ॥ तुमचे घरीं ॥२१॥

तुझें नाम जुणवंती ॥ जन्मनाम मायावती ॥ तुजवरी असे अतिप्रीती ॥ देवश्रम्याची ॥२२॥

तुं जाहलीसि उपवरी ॥ तेणें चिंता लागली अंतरीं ॥ मग तुजसी दीधलें वेदमंत्री ॥ चंद्रशिष्यासी ॥२३॥

पुढें कोणेएके अवसरीं ॥ पिता पती गेले वनांतरी ॥ समिधा आणावया पवित्रीं ॥ पुण्यतरुंच्या ॥२४॥

ऎसे हिंडता वनांतरे ॥ तया भक्षिले निशाचरें ॥ ते मात आली परस्परें ॥ तुझे घरासी ॥२५॥

मग नानापरी शोक अमुप ॥ तुंवा केला दु:खविलाप ॥ परि और्ध्वदेहिकें पति आणि बाप ॥ लाविले सदतीसी ॥२६॥

मग मांडिली व्रतें दानें ॥ मासउपवास चांद्रायणें ॥ कार्तिक आणि माघस्नानें ॥ करिसी सदा ॥२७॥

तुळसी लाविल्या देवस्थानीं ॥ अखंडदीप देवसदनीं ॥ चौक रांगोळिया सुमनीं ॥ पुजिलें हरिहरा ॥२८॥

कार्तिकमासाभीतरीं ॥ भावें पुजिसी तुं धात्री ॥ आणि भोजन नानापरी ॥ करिसी तखवटीं तयेचे ॥२९॥

जें जें करिसी पुण्यस्नान ॥ ते परिस्वरुपी विष्णुअर्पण ॥ हरिकीर्तन जागरण ॥ ऎकसी सदा ॥३०॥

एकादशी सोमवार ॥ सदा करिसी निराहार ॥ पतिरुप मानुनि ईश्वर॥ संकल्प केला ॥३१॥

ऎसें करिता निरंतरी ॥ आयुष्य गेलें याचिपरी ॥ तवं ज्वर उपजला शरींरी ॥ सीतोदकीं नाहंता ॥३२॥

मग अन्न वर्जिले सर्वथा ॥ परि न राहसी कार्तिक न्हाता ॥ तंव प्राण गेला अवचिता ॥ न्हातां उदकीं ॥३३॥

तुज वाहोनियां विमानीं ॥ वैष्णवीं नेलें वैकुंठभुवनीं ॥ जेथें कामधेनुची दुभवणी ॥ घरीं तुझिये ॥३४॥

पुढें पावलें युगद्घापार ॥ देव अवतरले भुतळीं समग्र ॥ मीहीं आलों येथें शीघ्र ॥ दैत्य वधावया ॥३५॥

तुंही आलीसि भुतळीं ॥ सत्राजिताचिये कुळीं ॥ महरुपें लावण्यें आगळी ॥ सर्वामाजी ॥३६॥

सत्राजित तो देवश्रमा ॥ सकुर तो चंद्रनामा ॥ जुणवंती तुं सत्यभामा ॥ सत्य जाण ॥३७॥

तुळसी लाविल्या देवद्घारी ॥ ह्यणोनि पारिजारक तवमंदिरीं ॥ दिपदानार्थ रुपें सुंदरी ॥ जाहलीसि तुं ॥३८॥

भ्रतारस्वरुपी गोविंद ॥ मुखें करिसी अनुवाद ॥ तया पुण्याचा ऋणानुब्मध ॥ देणें मज ॥३९॥

केलीं कार्तिकमाघस्नानें ॥ तेणें तुं आगळी महादानें ॥ ह्यणोनि गोपिकांचेनि साभिमा नें ॥ चालसी तुं ॥४०॥

तरी तुझिये सुकृता ॥ उत्तीर्ण नव्हें मी सर्वथा ॥ तिवां दीधलें ब्रह्यसुता ॥ दानीं मज ॥४१॥

ऎसी बोलता पुर्वकथा ॥ तंव आरक्त जाहला सविता ॥ मग देव आला मागुता ॥ राजभुवनासी ॥४२॥

वैशंपायन ह्यणे भारता ॥ तुवां पुसिली मुळकथा ॥ तरी सत्यभामा गोपिनाथा ॥ वल्लभा ऎसी ॥४३॥

कार्तिकस्नानाचिया सुकृता ॥ सकळ पृथ्वी न पुरे लिहितां ॥ चमत्कार झाला तो भारता ॥ सांगो तुज ॥४४॥

कलहा नामें निशाचरी ॥ जे पडली होती अघोरी ॥ ते उद्घरली अल्पमात्रीं ॥ कार्तिकपुण्यें ॥४५॥

तंव राव ह्यणे गा मुनी ॥ कलहा ते कोणाची कोणी ॥ आणि उद्घरली कवणेगुणी ॥ तें सांगा मज ॥४६॥

मग रायासि ह्यणे मुनी ॥ ते सोरटदेशीची ब्राह्यणी ॥ कलहानामें कामिनी ॥ ब्राह्यणाची ॥४७॥

ते पतिवंचका निर्धारी ॥ सर्वकाळ करणी करी ॥ कलह नाहीं तरी शरींरी ॥ नये निद्रा ॥४८॥

भतारासीं करी झगडां ॥ तया घाली खरवडी कोंडा ॥ आपण खातसे दुधमांडा ॥ गोरसेंसी ॥४९॥

तया पाणी न ठेवी आंघोळी ॥ आपण जेवी सकाळी ॥ काहीं ह्यणतां तरी कळी ॥ मांडी सत्वर ॥५०॥

पाहुणा देखता आंगणीं ॥ ह्यणे उदक नाहीं रांजणी ॥ पोटदेखण्याचे लक्षणीं ॥ लोळे लटिकीच ॥५१॥

सुगंधद्रव्यें लावी निढळी ॥ वरी बांधी चिंधीचोळी ॥ मग न उठे कदाकाळीं ॥ पायां पडतां ॥५२॥

विंचुवाचे शेजवाजे ॥ तेथें काय निद्रा भोगिजे ॥ तैसा जन्म गेला भाजे ॥ सेविता त्याचा ॥५३॥

तंव कोणे एके अवसरी ॥ भ्रतार उपवासी तीन रात्री ॥ मग ह्यणे धिक् संसारीं ॥ जिणें माझें ॥५४॥

हे कलहकारिणी कांता ॥ दु:शीला आणि पुत्ररहिता ॥ आतां पुर्वजाचे हिता ॥ प्रवर्ती केवीं ॥५५॥

जरी गृहीणी करुं दुसरी ॥ तरि हेतो निर्धारें निशाचरी ॥ तें तिणें ऎकिलें कर्णद्घारीं ॥ बोलणें त्याचें ॥५६॥

मग उठिली हात पिटिती ॥ ह्यणे कैसी आणी पां सवती ॥ ऎसें हुणोनि आत्मघाती ॥ जीव दीधला तयेनें ॥५७॥

ते मृत्यु पावली अत्मघातीं ॥ ह्यणोनी नेली यमदुतीं ॥ सहस्त्रवर्षे नरकांप्रांती ॥ पचवली ते ॥५८॥

मग टाकिली मृत्युभुवनीं ॥ नाना भोगीतसे योनी ॥ तयेसि करिंता जाचणी ॥ शिणले दुत ॥५९॥

पतिवाचोनि करि भोजन ॥ ह्यणोनि वाघुळा जाहली निर्माण ॥ अधोभागी करोनि वदन ॥ भक्षी विष्ठा ॥६०॥

कलह करी ह्यणोनि मांजरी ॥ मांडे खाय ह्यणोनि सुकरी ॥ आत्मघातें निशांचरी ॥ पावली देग ॥६१॥

ऎसी झालिया परवडी ॥ मग राक्षसी जाहली मारवाडी ॥ उदकें वीण तनु कोरडी ॥ झाली तियेची ॥६२॥

ऎसी जाहली वर्षे पंधरा ॥ पिशाची हिंडे सैरवैरा ॥ मग संचरली एका नगरा ॥ राक्षीसी ते ॥६३।

तेथें एका वैश्याचे शरीरीं ॥ संचार करी निशाचरी ॥ तंव तो जाहला अनाचरी ॥ तिचेनि दोषें ॥६४॥

मग कृष्णाणीचे मेळी ॥ तया वैश्यें केली आंघोळी ॥ तंव राक्षिसी दवडिली तात्काळी ॥ विष्णुदुतीं ॥६५॥

तया स्नानाचेनि सुकृतें ॥ राक्षसी पळविली विष्णुसुतें ॥ मग आली उत्तरपंथे ॥ कावेरीपट्ट्णासी ॥६६॥

तेथें धर्मदत्त नामें विप्रा ॥ तया दोनी स्त्रिया सुंदरा ॥ तंव तो पुजेसि हरिहरां ॥ जातहोता ॥६७॥

तो कार्तिकस्नानाचा नेमस्थ ॥ कृपादानी अति विरस्त ॥ महाशील आणि विष्णुभक्त ॥ पवित्रपणें ॥६८॥

तो निशीचेनि अवसरीं ॥ जात होता हरिमंदिरी ॥ तंव धावित्रली निशाचरी ॥ खावयासी ॥६९॥

मग तिचेनि भ्यालेपणें ॥ कलशींचे उदक पडिलें त्राणें ॥ पुजेपत्रीचें सांडणें ॥ जाहलें तिजवरी ॥७०॥

तंव तिये झाला जातिस्मर ॥ ह्यणे मी ब्राह्यणी पुर्वापार ॥ मज आत्महत्येचे अक्षर ॥ घडलें होतें ॥७१॥

मागें मी होतें पतिवचका ॥ तेणे भोगिले नानानकी ॥ परि आत्महत्येची टीका ॥ घडली होती ॥७२॥

ऎसा बोलोनिया विचार ॥ येरी नावेक जाहली स्थीर ॥ तंव बोलीला द्घीजवर ॥ तयेप्रती ॥७३॥

ह्यणें तुं कोण गे कैसी ॥ राक्षसी आह्यां छळों आलीसी ॥ तरी स्तवन करोनि मानसीं ॥ चिंतिसी काय ॥७४॥

मग ते कलहा राक्षसी ॥ समुळ वृत्त सांगे तयासी ॥ हुणे तुझे गा उदकस्पर्शी ॥ जाहलें ज्ञान मज ॥७५॥

तरी ब्राह्यणा तुझें सुकृत ॥ मज त्वां द्यांवे किंचित ॥ तेणें मागील दुष्टोपार्जित ॥ भंगेल माझें ॥७६॥

मग कार्तिकस्नानचें अर्धपुणु ॥ येरें तयेसि केलें अर्पण ॥ तंव ते दिव्यरुप आपण ॥ जाहली नारी ॥७७॥

ऎसें निरसलें पुर्वपातक ॥ तंव पावले हरीचे पुष्पक ॥ तये वाहुनिया सेवक ॥ बोलिले द्घिजवरासी ॥७८॥

ह्यणती अगा ये धर्मदत्ता ॥ त्वां सोडविले या अनाथा ॥ थोर हरिली दु:खव्यथा ॥ राक्षसभावाची ॥७९॥

तुवां दीधलें एकविधा ॥ तरी तुझें सुकृत हो शतवृद्घा ॥ कार्तिकीसि गा महाबुधा ॥ नाहीं सीमा ॥८०॥

या तुझिया गा सुकृत ॥ थोर आभार जडला अनंता ॥ तरी पुत्र होईल तें आतां ॥ सांगो तुज ॥८१॥

आतं ऎक पां सिंद्घांत ॥ पुढें तुं होसील राजा दशरथ ॥ तुजसी पुत्र गा रघुनाथ ॥ होईल जाण ॥८२॥

आणि अगा ये द्घिजवरा ॥ या तुझिया दो नी सुंदरा ॥ त्या कौसल्या आणि सुमित्रा ॥ होतील जाण ॥८३॥

हे कलहा नामें निशाचरी ॥ ते कैकेई होईल निर्धारी ॥ ऎशा तिन्ही या सुंदरी ॥ भोगिसील तुं ॥८४॥

हे पद्मपुराणींची कथा ॥ कार्तिकमाहात्मीं गा भारता ॥ तंव पुसी केली विष्णूदुता ॥ वित्रें तेणें ॥८५॥

आतां असो हे राक्षसी ॥ दुसरी आरंभिली पुसी ॥ ते सांगंए श्रोतयांसी ॥ ह्यणे कृष्णयाज्ञवल्की ॥८६॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ कार्तिकमाहात्म्यविस्तार्य ॥ द्घितीयोsध्यायीं सागितला ॥८७॥

॥श्री सांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP