|
पु. पुरुष . गांजाचा अम्मल दारुवानी बायकी नव्हं , गांजा मर्द हाय मर्द . - बाय ४ . २ . शूर , पराक्रमी , हिंमतदार मनुष्य . पैका नामर्दाचा इज्जत व यश मर्दाचें . - ब्रच ८८ . नवरा ; स्त्रिया आपल्या नांवापुढें व नवर्याच्या नांवापूर्वी योजतात . रखेली ( महारीण , कैकाडीण ) आपल्या यजमानाच्या ( विशेषतः मुसलमान ) नांवापूर्वीं हा शब्द पत्रांतून योजिते . राणू मर्द हशमखान खडीवाले . [ वैसं . मर्य ; फा . मर्द ] ०गाजी माणूस - पु . शूर , मर्द गडी ; पराक्रमी माणूस . मर्दा मर्दाना नी - वि . शूर ; धैर्यवान . - मराआ ३६ . ( विशेषतः मर्दानी ) पुरुषी . याच्या उलट जनानी . [ फा . मर्दाना - नी ] मर्दई , मर्दपणा - स्त्रीपु . धैर्य ; धीटपणा ; शौर्य ; पराक्रम ; पौरुष . शौर्याचीं , पराक्रमाचीं कृत्यें . मर्दानी मिशी - स्त्री . ( पुरुषत्वाचें लक्षण ) प्रौढी मारताना , दम देतांना , धाक दाखवितांना पुरुष योजतात . मर्दानगिरी , मर्दानगी - स्त्री . मर्दुमकी ; शौर्य ; पौरुष . हे जागा मर्दानगिरीची आहे . - ऐस्फुले १ . २१ . परंतु टिपूची मर्दानगी अ दिलेरी पाहून हे आपले चित्तांत भय मानून आहेत . - पदमव १०८ . मर्दाना - पुरुषांची बैठक . फार करुन जनान्यांत असतात . येकादों - दिवसां आंत दोन तीन घटिका मर्दाना करुन ... कांहीं जाब - साल होतो . - रा ७ . ११९ . - वि . मर्दा पहा . मर्दानी , णी - वि . पुरुषास योग्य , साजेसें ( वस्त्र , पोशाख इ० ); याच्या उलट जनानी . शिकारीसारखी मर्दानी मौज नाहीं असें पुरुष म्हणतात . - बाय ३ . ३ . पुरुषी ; पुरुषांचा ( आवाज इ० ). पुरुषी आवाजाची जरुरी असलेलें ( गाणें इ० ). पुरुषासंबंधीं . ०खेळ पु. अंगमेहनतीचा , पराक्रमाचा , ताकदीचा प्रयोग , खेळ . मर्दामर्दी स्त्री . शौर्य ; पौरुष ; पराक्रम ; मर्दुमी . - क्रिवि . धिटाईनें ; शौर्यानें ; मर्दपणानें . पुरुषी धडाडीनें ; उत्साहानें . हशमाच्या लोकांनीं कोटासच मर्दामर्दी शिडी टेंकून चढले . - व्रप ७४ . त्यानें पैसा जवळ नसतां मर्दामर्दीं लग्न केलें . अतिशय श्रमानें , कष्टानें . मर्दामर्दी तो चोर धरला . मोठ्या जुलमानें ; संकटानें . मर्दामर्दी तो वांचला - जगला . मर्दी , मर्दुमी - स्त्री . शौर्य ; पराक्रम ; साहस . परशुराम रामचंद्र यांणीं मोठे मर्दुमीनें लढाई दिली . - ख ११ . ६१०४ . शौर्याचें , पराक्रमाचें , साहसी कृत्य . [ फा . ] मर्दुम - पु . मनुष्य ; माणूस . [ फा . मर्दुम ] मर्दुमकी - मर्दी पहा . मर्दुमकी शाबासकीचा मालक . - गोखचिशाब ६ . ५ .
|