|
न. गूढ शक्ति ; सुप्त गुणधर्म ; कार्यसाधक गुण ( याचें अनुमान कार्यावरुन होतें ). सर्व पदार्थांमध्यें जीं ईश्वरानें मर्मे ठेविलीं आहेत तीं कोणास समजतात . ( शरीरादिकाचा ) नाजूक भाग , अवयव ; जिव्हाळी ; वर्म . छिद्र ; उणेपणा ; व्यंग . मर्म उघडितां , मानी पुरुष बुडाले त्रपेंत , जड तरले । - मोआदि २४ . ४७ . रहस्य ; गूढार्थ ; खरा आंतला हेतु ( भाषण , लेख इ० चा , ); तात्पर्य . मेख ; मुद्दा ; खोंच ; रोंख . कला ; खुबी ; गूढविद्या ; युक्ति ; गुरुकिल्ली ( एखादें कोडें , रचना , क्रिया , धंदा इ० ची ). अद्यापि श्लोक लावण्याचें मर्म तुला समजलें नाहीं . घड्याळांतलें मर्म कळत नाहीं . शत्रु ; अरि ; नाशक ; भंजक ; उलट आणि प्रतिक्रिया करणार्या गुणांची वस्तु . केळ्यांचें मर्म तूप , गव्हाचें मर्म कांकडी . [ सं . ] ०भेद पु. नाजुक भागावर केलेला आघात ; जिव्हाळीं झालेली जखम . ( ल . ) जिव्हाळीं लागणें , झोंबणें ; मर्मस्पर्श . कट , युक्ति , बेत शोधून काढणें ; खुबी , रहस्य हुडकणें ; बिंग बाहेर काढणें ; गुढपरिज्ञान . एखाद्याचा उणेपणा , व्यंग , दोष इ० चा स्फोट करणें ; एखाद्याच्या मनाला झोंबेल अशा गोष्टी उघड करणें . ०भेदक भेदी वेधक वेधी - वि . जिव्हाळीं स्पर्श करणारा ; नाजूक भागाला जखम करणारा ; बिंगे उघडकीस आणणारा ( अक्षरशः व ल . ). वेत्ता - वि . मर्म जाणणारा ; मर्मज्ञ . ०स्थल स्थान - न . नाजूक भाग ; जिव्हाळी . ( ल . ) दोष , उणीव असलेलें स्थान ; व्यंग . स्पृक - वि . नाजुक भागावर स्पर्श करणारा , जखम करणारा ; चावा घेणारा ( अक्षरशः व ल . ); मर्मभेदी . ०ज्ञ वि. मर्म , गूढ , खुबी जाणणारा . अत्यंत कुशल ; निपुण ; पंडित . मर्मण - वि . मर्मज्ञ ( अप . ) मानवा सुजाणा मर्मणा सुजाणा । - देप ११३ . मर्मान्वेषण - न . एखाद्याचें मर्म , उणेपणा शोधून काढणें ; छिद्रान्वेषण . ( अक्षरशः व ल . ) मर्मान्वेषी - वि . मर्म , दोष , उणें शोधणारा ; छिद्रान्वेषी . मर्मी - वि . गुप्त , गूढ गोष्टी जाणणारा . एखाद्या गोष्टींत अत्यंत निपुण ; कुशल ; मर्मज्ञ . मर्मभेदी ; भेदक ; झोंबणारें ; टीकात्मक ( भाषण ). मर्मीक - वि . ( प्र . ) मार्मिक पहा . मर्मोदघाटक - वि . एखाद्याचें मर्म , दोषस्थल , कमीपणा उघडकीस आणणारा ; मर्मभेदी . मर्मोदघाटन - न . एखाद्याचें व्यंग , उणें , दोष उघडकीस आणणें ; मर्मभेद .
|