|
वि. उपस्थित ; विद्यमान ; हजर . [ अर . हाझिर् ] म्ह० हाजीर तो वजीर = वेळेला जो कोण असेल त्याचें काम साधणें . जबाब , जाब - पु . त्वरित उत्तर ; समयसूचक उत्तर . - वि . त्वरित उत्तर देणारा ; समयसूचकता असलेला . [ फा . ] ०जबाबी जाबी - वि . हजीर जबाब अर्थ २ पहा . [ फा . ] ०जामिनकी स्त्री. हाजीरजामीनाचा हुद्दा व काम . ०जामीन पु. नेमलेल्या वेळीं आरोपीस ( कोर्ट इ० त ) हजर करण्यासाठीं घेतलेला ओलीचा माणूस ; हमीदार . ०निशी स्त्री. हाजीरनीसाचें काम व हुद्दा . [ फा . ] ०नीस पु. सैन्याची हजेरी घेणारा व तत्संबंधीं कामें करणारा अधिकारी . [ फा . ०बाशी हाजरबाशी - स्त्री . वास्तव्य ; मुलाजमत . दरबारीं हाजरबाशी करून सरकारची दौलतखाई चिंतीत आहों . - चिरा ३५ . [ फा . ] ०बिगार स्त्री. तयार ठेवलेल्या बिगार्यांकडून केलेली सामानाची वहातूक . [ हिं . ] ०बिगारी पु. हजीरबिगार करणारा बिगारी , माणूस . [ हिं . ] ०मजालस मजालीस - स्त्री . १ खटला ऐकावयाची दिवाणाची कचेरी ; न्यायमंदिर ; दरबार . २ अशा कोर्ट - दरबारांतील सभासद . ३ कोणत्याहि प्रसंगीं हजर असलेली सर्व मंडळी , समाज . ४ मामलेदार , मुन्सफ वगैरे तक्रार ऐकणार्या सरकारी अधिकार्याकडे केलेली लेखी तक्रार , अर्ज . - क्रिवि . १ भर न्यायकचेरीत , प्रत्यक्ष ; सभेसमोर ; सरकारी कोर्टापुढें . २ जगासमोर ; लोकांपुढे ; चारचौघांसमक्ष . मी तुला घरांत सांगणार नाहीं हाजीरमजालीस कायतें सांगेन . हजीरमजालिसीची याद - स्त्री . सभेंतील जमलेल्या सर्व लोकांच्या सह्या घेतलेला कागद , निकालपत्र . हजेरीची फौज - स्त्री . नेहमींचें खडें सैन्य .
|