Dictionaries | References

कसे झाले तरी वाघाचें पिलूं

   
Script: Devanagari

कसे झाले तरी वाघाचें पिलूं

   पराक्रमी मनुष्‍याची वृत्ति छापून राहात नाहीं, ती कोणत्‍याहि स्‍थितींत बाहेर पडते. [ एकदां एका वाघानें एका कोल्‍हीस मारले तेव्हां तिचे लहान पिलूं होते ते आणून वाघिणीजवळ दिले. तिने त्‍यास आपले दूध पाजून इतर पिलांबरोबर वाढविले. पुढे तिच्या इतर पिलांबरोबर हा कोल्‍हा एकदां रानात गेला असतां त्‍या पिलांनी एका हत्तीवर चाल केली. हे पाहून कोल्‍हा घाबरला व घरी पळून आला. तेव्हां वाघ्‍याच्या पिल्‍लांनी त्‍यास भित्रा म्‍हणून चिडविले. मग कोल्‍ह्‍याने वाघीणीस विचारतां तिने सांगितले, की तूं कोल्‍हा आहेस व ती कशी झाली तरी वाघाची पिलें आहेत. हें ऐकून कोल्‍ह्‍यास भीति वाटून तो रानात पळून गेला. ] तु०- शूरोसि कृतिविद्योसि दर्शनीयोसि पुत्रक। कुले तस्‍मिन्‌ प्रजातोसि गजो यत्र न हन्यते। -पंत्रतंत्र.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP