|
न. १ नाम अर्थ १ , २ पहा . नांव तुजे नावचि या संसाराभोधिला तरायासी । - भक्तमयूरकेका ४० . २ ( ल . ) कीर्ति ; ख्याती ; लौकिक ; पत ; अब्रू ; चांगले काम . सकल म्हणती नांव राखिले । वडिलांचे । - दा ३ . ४ . १४ . ३ दुर्लौकिक ; डाग ; कलंक ; बदनामी ; दुष्कीर्ति ; नापत ; ( क्रि० ठेवणे ). ४ भांड्यावर नांव घालण्याचे कासारी हत्यार . - बदलापूर ९६ . ५ नवरा बायकोने उखाणा घालून घ्यावयाचे परस्परांचे नांव ( क्रि० घेणे ). [ सं . नाम ; हिं . नाओ ; जुने हिं . नाऊं ; पं . सिं . नाउं ; फ्रेंजि . नव ; इं . नेम ] ( वाप्र . ) ०करणे कीर्ति गाजविणे . ०काढणे नांव गाजविणे ; प्रसिद्धीस येणे . ०काढणे कुरापत काढणे ; कळ लावणे . ०खारणे उक्रि . ( कों . ) नांव घेऊन निर्देश करणे ; नांवाचा उल्लेख करणे ; नांव घेणे . ०गांव - माहिती विचारणे ; सामान्य विचारपूस करणे . विचारणे - माहिती विचारणे ; सामान्य विचारपूस करणे . ०जळो भाजी नावांस हळद लागो तळतळाट किंवा शाप देण्याचा वाक्प्रचार . ०ठेवणे फोडणे - ( बायकी ) खेळांत एखाद्या वेळी दोन मुलींस एकदम शिवल्याचा प्रसंग येतो तेव्हा डाव कोणी घ्यावा ह्याविषयी तंटा होतो त्यावेळी त्या दोन्ही मुली एकमेकांच्या संमतीने नावे बदलून ठेवतात . मग त्यांतील एखाद्या मुलीस आपले नाव सांगून ती त्यातील कुठले नांव मागेल ते तिला देऊन उरलेल्या नांवाच्या मुलीने डाव घ्यावयाचा असतो . व फोडणे - ( बायकी ) खेळांत एखाद्या वेळी दोन मुलींस एकदम शिवल्याचा प्रसंग येतो तेव्हा डाव कोणी घ्यावा ह्याविषयी तंटा होतो त्यावेळी त्या दोन्ही मुली एकमेकांच्या संमतीने नावे बदलून ठेवतात . मग त्यांतील एखाद्या मुलीस आपले नाव सांगून ती त्यातील कुठले नांव मागेल ते तिला देऊन उरलेल्या नांवाच्या मुलीने डाव घ्यावयाचा असतो . ०ठेवणे १ दोष देणे ; व्यंग काडणे . म्ह ० नांव ठेवी लोकाला शेंबूड आपल्या नाकाला = दुसर्याला ज्या दोषाबद्दल नांवे ठेवावयाची तोच स्वतांत असणे . २ जन्मलेल्या मुलाचे नामकरण करणे ; ०डहाळ - ( ना . ) बदनामी होणे . होणे - ( ना . ) बदनामी होणे . ०डाहार - ( व . ) नांव बद्दू करणे . करणे - ( व . ) नांव बद्दू करणे . ०डालणे ( परदेशी तेली ) प्रेताच्या सारवलेल्या जागेवर केळीचे पान ठेवून त्यावर प्रत्येक मनुष्याने मयताचे नांव घेऊन कालवलेल्या भाताचा घांस ठेवणे . - बदलापूर २६७ . ०धुळीत मातीत पाण्यांत इ० जाणे मिळणे पडणे - नांवावर पाणी घालणे पहा . ०नको तिटकारा , चिळस , द्वेष दाखविणारा शब्द . ०न - अलिप्त राहणे ; अंगांस संसर्ग न लागू देणे ; दूर राहणे ; नांव न काढणे . घेणे - अलिप्त राहणे ; अंगांस संसर्ग न लागू देणे ; दूर राहणे ; नांव न काढणे . ०नाही नसणे ( विद्या , पैसा इ० कांचा ) पूर्णपणे अभाव असणे ; नांव , निशाण , खूण कांही नसणे . ०बदलणे नामोशी पत्करणे ( प्रतिज्ञेच्या वेळी योजतात ). अमूक झाले तर नांव बदलून टाकीन . ०मिळविणे वादविवाद लढाई इ० मध्ये कीर्ति मिळविणे . ०सांगणे लावणे घालणे देणे किंमत , शर्ती ठरविणे . ०सांगणे लावणे घालणे देणे किंमत , शर्ती ठरविणे . ०सांगणी वाडनि़श्चय ; कुणब्यांतील वधुवरांची व त्यांच्या मात्यापित्यांची नांवे जातीच्या सभेमध्ये जाहीर करुन लग्न ठरविण्याचा समारंभ . ०सोडणे टाकणे त्याग करणे ; संबंध सोडणे ; इच्छा न करणे . नावांचा १ खरा . मी ते काम करीन तरच नांवाचा . २ नामधारी ; केव नांवापुरता . मी जॉन्सनचा नांवाचा मात्र गुरु होतो , खरोखर पहातां तो माझ्याहून वरचढ होता . - नि ३ चांगले नांव लौकिक असलेला . नांवाची बोंब पडणे वाईट गोष्टीला कारणीभूत होणे किंवा एखाद्या तक्रारीचा विषय होऊन बसणे . नांवाने घागर फोडणे संबंध तोडणे ; मेला असे समजणे . तियेचेनि नांवे फोडावी घागर । नाही ते संसारी बहिणी म्हणे । - ब ४७ ०नावाने तावणे , तापविणे - एखाद्याचा द्वेष करणे , किंवा मरण चिंतणे . नावाने पूज्य असणे - पूर्ण अभाव असणे . विद्येच्या नांवाने जरी आवळ्या एवढे ( पूज्य ) म्हणतां येणार नाही तरी मासला तोच । - मधलीस्थिति . नांवाने बोंब मारणे , शंख करणे , खडे फोडणे - एखाद्या विरुद्ध बोभाटा , ओरड करणे . नांवाने भंडार उधळणे - स्तुति करणे . नांवाने शंख - पूर्ण अभाव असणे . नांवाने हाका मारीत बसणे - दुसर्याने नुकसान केले अशी विनाकारण ओरड करीत सुटणे . नांवावर - १ नांवासाठी - करितां - मुळे - खातर . २ ( जमाखर्च ) खात्यावर ; नांवे . नांवावर गौर्या फोडणे - घालणे - रचणे - एखाद्याचे वाईट करणे नांवावर घालणे - कीर्तीवर पाणी सोडणे ; चांगले नांव , लौकिक बुडविणे . नांवावर विकणे - स्वतःच्या नुसत्या किंवा दुसर्या - मोठ्याच्या नांवाचा फायदा घेणे ; त्यांवर नाव प्रसिद्धि मिळविणे ; खपणे . नांवास चढणे - कीर्तिमान होणे ; लौकिक वाढणे . नांवास देखील नाही - शपथेस किंवा नाव घेण्यास देखील नाही . याच्या अगोदर ज्याचे नांव हे शब्द जोडतात म्हणजे त्याचा अर्थ अगदी मुळीच नाही असा होतो . यंदा पाऊस ज्याचे नाव पडला नाही . ज्याचे नांव ते - ( नांव घेण्यास अयोग्य अथवा अमंगल म्हणून ज्याचे नांव घेतले नाही तो अथवा ते ) जे पाहिजे असते अथवा ज्याची आशा केलेली असते ते कधी न देणार्या , करणार्या मनुष्य - वस्तू इ० संबंधी योजतात . सामाशब्द - पाणी तावणे , तापविणे - एखाद्याचा द्वेष करणे , किंवा मरण चिंतणे . नावाने पूज्य असणे - पूर्ण अभाव असणे . विद्येच्या नांवाने जरी आवळ्या एवढे ( पूज्य ) म्हणतां येणार नाही तरी मासला तोच । - मधलीस्थिति . नांवाने बोंब मारणे , शंख करणे , खडे फोडणे - एखाद्या विरुद्ध बोभाटा , ओरड करणे . नांवाने भंडार उधळणे - स्तुति करणे . नांवाने शंख - पूर्ण अभाव असणे . नांवाने हाका मारीत बसणे - दुसर्याने नुकसान केले अशी विनाकारण ओरड करीत सुटणे . नांवावर - १ नांवासाठी - करितां - मुळे - खातर . २ ( जमाखर्च ) खात्यावर ; नांवे . नांवावर गौर्या फोडणे - घालणे - रचणे - एखाद्याचे वाईट करणे नांवावर घालणे - कीर्तीवर पाणी सोडणे ; चांगले नांव , लौकिक बुडविणे . नांवावर विकणे - स्वतःच्या नुसत्या किंवा दुसर्या - मोठ्याच्या नांवाचा फायदा घेणे ; त्यांवर नाव प्रसिद्धि मिळविणे ; खपणे . नांवास चढणे - कीर्तिमान होणे ; लौकिक वाढणे . नांवास देखील नाही - शपथेस किंवा नाव घेण्यास देखील नाही . याच्या अगोदर ज्याचे नांव हे शब्द जोडतात म्हणजे त्याचा अर्थ अगदी मुळीच नाही असा होतो . यंदा पाऊस ज्याचे नाव पडला नाही . ज्याचे नांव ते - ( नांव घेण्यास अयोग्य अथवा अमंगल म्हणून ज्याचे नांव घेतले नाही तो अथवा ते ) जे पाहिजे असते अथवा ज्याची आशा केलेली असते ते कधी न देणार्या , करणार्या मनुष्य - वस्तू इ० संबंधी योजतात . सामाशब्द - ०कर री वि . १ कीर्तिमान ; प्रसिद्ध ; नावलौकिकाचा . वडिल नांवकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । - ऐपो ३५८ . २ दुसर्याचे नांव धारण करणारा ; एकाच नावांचा दुसरा नामधीरी . ०कुल वि. ( ना . ) सगळा ; एकूण एक . ०ग्रहण न. नांव घेणे ; उल्लेख करणे ; नामनिर्देश ( क्रि० करणे ; घेणे ; काढणे ). ०ग्रहण - सोडणे - नांव टाकणे पहा . टाकणे - सोडणे - नांव टाकणे पहा . ०ग्रहण नसणे - नांवा गांवाची कांहीहि माहिती नसणे . ठाऊक नसणे - नांवा गांवाची कांहीहि माहिती नसणे . ०धारक वि. नामधारक अर्थ २ पहा . ०नट वि. क्रिवि . पूर्णपणे नष्ट झालेला ; बेचिराख झालेला ; थांग ; पत्ता ; माग , खूण , अवशेष नसलेला . त्याची गाय गुराख्याने नांवनट केली . [ नांव + नष्ट ] ०नांगर पु. पेरणीच्या वेळी प्रथम नांगर धरण्याचा व निवाडपत्रांत निशाण्या करतांना प्रथम नांगराची निशाणी करण्याचा पाटील अथवा देशमूख यांचा मान . ०नांव वि. ( ना . ) नावकुल पहा . सबंध सगळा . ०निशाण न. सर्व वृत्तांत ( कुल , नांव , गांव इ० ). ०निशाण असणे - कुलशील परंपरा ठाऊक असणे . ठाऊक असणे - कुलशील परंपरा ठाऊक असणे . ०निशी स्त्री. १ नांवांची यादी . २ तीत दाखल केलेले नांव . माझी नांवनिशी काढ [ नांव + फा . नविशी ] ०निशीवार क्रिवि . नांवा बरहुकूम ; नांवनिशीतील नांवांच्या अनुक्रमाने . ( क्रि० घेणे ; मागणे ). ०नेम १ ( फलज्यो . ) नांवावरुन राशी , गण , नक्षत्र इ० कांची माहिती काढणे . २ अशी काढलेली माहिती . ०बुडव्या वि. स्वतःचा लौकिक , पत , किंमत घालविणारा ( मनुष्य वस्तु ). ०रस रास - स्त्री . १ ( फलज्यो . ) जन्मकालीन नक्षत्रानाम काढणे . मग बोलाविले ज्योतिषी । भूमी पाहिली चौरासी । तव दक्षाचिया नावरासी घातचंद्र । - कथा ३ . १० . ९९ . २ अशा तर्हेने काढलेले नांव , कुंडली इ० ( क्रि० काढणे ). ३ जन्मनक्षत्रावरुन पहावयाचे वधूवरांचे राशीघटित ; नावांवरुन लग्न जमविणे . ( क्रि० काढणे ; पाहणे ; ठरविणे ). ०राशीस , उतरणे , जमणे - मिळणे - नांवांवरुन वधूवरांचा घटित विचार केला असता अनुकूलता येणे , कुंडलीवरुन लग्न जमणे . [ नांव + राशि ] येणे , उतरणे , जमणे - मिळणे - नांवांवरुन वधूवरांचा घटित विचार केला असता अनुकूलता येणे , कुंडलीवरुन लग्न जमणे . [ नांव + राशि ] ०रुप न. १ कीर्ति ; अब्रू ; पत . नांव अर्थ २ पहा . त्याने त्या लढाईमध्ये नांवरुप मिळविले . माझे लपो असतेपण । नांवरुपाशी पडो खंडन । २ सार्थक ; योग्यस्थानी विनियोग . विद्वानास पुस्तक दिले असतां त्याचे नांवरुप होते . ३ नांव आणि आकार ; व्यक्तित्व ; स्वतंत्र वेगळे अस्तित्व . जैसे समुद्रास मिळतां गंगेचे आप । तात्काळ निरसे नांवरुप । नांवलौकिक पु . प्रसिद्धि ; मोठेपणा ; कीर्ति ; ख्याति . ०वार क्रिवि . नांवाबरहुकूम ; नांवनिशीवर पहा . ०सकी स्त्री. ( कु ) लौकिक ; कीर्ति ; प्रसिद्धि . ०सता वि. ( कु . ) प्रसिद्ध ; नांवाजलेला ; कीर्तिचा ( चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थी योजतात ). नांवनिराळा वि . अलिप्त ; अलग ( वाईट नांवापासून ); स्वतंत्र ; विरहीत . हा सर्व करुन नांवानिराळा . नावारुपांस आणणे येणे प्रसिद्धीस - मान्यतेस आणणे - येणे . नांवे ( जमाखर्च ) खर्चाची बाजू ; नांवाने ; खर्ची ; खर्चाकडे . नांवावर पहा .
|