Dictionaries | References

नेमस्त

   
Script: Devanagari

नेमस्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Middling, ordinary, common, not exceeding nor falling short of mediocrity or customariness: also moderate, temperate &c.

नेमस्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Middling, ordinary. Moderate, temperate.

नेमस्त     

वि.  बेताचा , मध्यम , मर्यादेतला , मवाळ .

नेमस्त     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  नेमाने वागणारा   Ex. माझे आजोबा फार नेमस्त आहेत.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
नियमित
Wordnet:
bdनेम गोनां
benনিয়মসেবী
kanನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುವ
kasبا قٲیدٕ , لَگاتار , ترتیٖب وار , با ضٲبطہٕ
malകൃത്യനിഷ്ടയുള്ള
telధర్మ నిష్టాపరుడు
urdبااصول , باقاعدہ , باضابطہ
See : नियुक्त

नेमस्त     

वि.  १ मध्यम ; साधारण ; सामान्य ; मध्यमप्रतीचा . तो पंडीत नेमस्त आहे . नेहमीपेक्षा कमी नव्हे असा , किंवा जास्तहि नव्हे असा . २ नियमित ; नेमाने वागणारा . ३ मवाळ ; आतांचा प्रागतिक . ( इं . ) लिबरल ( पक्ष ). याच्या उलट जहाल . ४ बेताचा ; बरोबर . हा मनुष्य उंच नव्हे , ठेंगणा नव्हे , नेमस्त आहे . ५ निश्चित ; स्पष्ट . विषयजनित जे जे सुख । तेथेच होते परमदुःख । पूर्वी गोड अंती शोक । नेमस्त आहे । - दा ३ . १० . ६५ . ६ नेमका . - मुवन २ . ८१ . नेमस्त कळेना वचन । नेमस्त नये राजकारण । - दा १५ . ३ . १४ . [ सं . नियम ]
०करणे   नियुक्त करणे ; योजणे . अमुक अमुक यांची कन्या वधू नेमस्त केली आहे . ( कुंकुमपत्रिकेत वापरतात ). अमक्याचा पुत्र वर नेमस्त केला आहे .
०पक्ष  पु. राजकारणांतील नेमस्त विचाराचा ( प्रागतिक , मवाळ ) पक्ष . ( इं . ) मॉडरेट , लिबरल पार्टी . - टि २ . १९४ . कारण त्यांना ( टिळकांना ) नेमस्त पक्षाशी भांडणे जरी आवश्यक वाटत असले ... - सुदे ६२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP