|
पु. क्रि.वि. चालू ; विद्यमान . आपणांस इनाम ... कारकिर्दी - दर कारकिर्दी मोकासियानीं माजी मुतैन रवा अस्त . - रा १५ . १४५ . [ फा . रवान ] ०दार पु. अनुमोदक . तुम्हीं सरकार नुकसानीचे रवादार कांहीं नाहीं . - रा ७ . ५६ . [ फा . रवा + दार ] कण ( बंदुकीची दारु , साखर वाळू इ० चा ). दिठी वियाचा रवा । नागरु इया ठेवा । - अमृ ९ . ५ . मध किंवा कढविलेलें तूप इ० न डिवचतां ठेवून दिले असतां त्यांत जे कण उत्पन्न होतात ते . ०रास्त वि. वहिवाटींतील ; शिरस्त्याचें ; परंपरागत व योग्य . [ फा . ] भरडलेलें गव्हाचें पीठ , सांजा , कणीक , तांदळांचें पीठ , इ० कांतील जाडा कणांश राहतो तो . खडा ; ढेप , ( गुळाचा , साखरेचा ). जे गोडी नाबदरासी । तेचि वेगळी रवेयासी । - एभा ४ . २६१ . सोन्याचांदीचा रज ; सोनें आटवून बारीक असा गोल आकाराचा केलेला लहान गोळा . दिव्यामध्यें तापलेल्या तेलांतून बाहेर काढावयाचा सोन्याचा किंवा धातूचा तुकडा . त्या सतीनें रवा काढिला . - वाडबाबा २ . ६३ . जो उगाळतात , ज्याचें गंध कुंकू , वगैरे करतात तो तांबडा हळकुंडाचा तुकडा ; विशिष्ट क्षाराचीं पुटें देऊन तांबडें केलेलं हळकुंड . रहाटाच्या कणेकडास बसविलेलें आढीस जोडणारें उभें लांकूड . दागिन्यावरील कंकर ; पेरांच्या आवटीची मुद्रा , ठसा ; सोनाराच्या पेरांची आवटी नांवाच्या ठशांतील खांच ( ज्यांत सोनें , चांदी , इ० चा पातळ पत्रा टोकला असतां त्यांत फुगा उत्पन्न होतो ). ०काढणें सोनें चांदी इ० चा रज किंवा तुकडा तापलेल्या तेलांतून हातानें बाहेर काढणें ; एक दिव्याचा प्रकार . रवा अर्थ ६ पहा . रवाळ वि . जाड्या कणांच्या रुपांत असलेलें ; दाणेदार ; कणदार ( तूप , मध , साखर इ० ). खरीपेक्षां मोठा व पत्रीपेक्षां लहान ( कोळसा ) - स्त्रीन . सोनाराचें एक हत्यार . रवाळणें पहा .
|