|
स्त्री. १ ( निंदार्थी ) विधवा . २ दासी ; कलावंतीण ; वेश्या . ३ ( तिरस्कार , राग किंवा अनाथ स्थिति दाखवावयाची असतां ) स्त्रीजात ; बायको . तुझी रांड रंडकी झाली . - नामना ९२ . ४ ( निरुद्योगीपणा , नवरा मेलेल्या स्त्रीच्या स्थितीप्रमाणें ) बिघडलेली , अतिशय खलावलेली स्थिति ; दुर्दशा . यंदा शेतें चांगलीं आलीं होतीं पण आंत पाणी शिरून अवघी रांड झाली . ५ ( निंदेनें ) भित्रा , नीच नामर्द मनुष्य ; युध्दांतून पळून जाणारा सैनिक . म्यां न वधावें पळतां चाला मारूनि काय रांडा या । - मोकर्ण ३५ . ६० . [ सं . रंडा ] म्ह० रांडेच्या लग्नाला छत्तीस विघ्नें . ( वाप्र . ) रांडेचा - वि . १ बेकायदेशीर संबंशापासून झालेला . २ ( ग्राम्य . ) पादपूरणार्थक किंवा उद्गारवाचक शब्द . ३ एक ग्राम्य शिवी . रांडेचा , रांडचा मारलेला - वि . स्त्रीवश ; स्त्रीलंपट रांडेच्यानो , रांडिच्यानो - उद्गा . ( बायकी ) रखेली पासून झालेल्या मुलांना उद्देशून बोललेल्या शब्दावरून पुष्कळदा आश्चर्य व्यक्त करण्याकरितां पन क्वचित निरर्थकपणें निघणारा उद्गार . रांडेवाचून पाणी पीत नाहीं - आपल्या बायकोला एखादा कठोर शब्द बोलल्यावांचून तो पाण्याचा थेंब सुध्दां पीत नाहीं ( सतत शिव्या देणार्या नवर्यासंबंधीं म्हणतात ). रांडेहून रांड - वि . बुळा ; अतिशय बायक्या ( मनुष्य ). सामाशब्द - ०अंमल पु. १ स्त्रीराज्य . २ नेभळा , अयशस्वी कारभार . ०काम न. १ बायकोचें काम ; गृहकृत्य . २ विधवेचें काम ; बाहेरील आडकाम किंवा रानांतील गवत कापणें व सर्पण गोळा करणें इ० काम . ०कारभार पु. १ बायकी कारभार . २ स्त्रियांचा कारभार ; स्त्रियांचीं कृत्यें . ३ ( निंदेनें ) भिकार , मूर्खपणाचीं कृत्यें ; दुबळीं कृत्यें . ०खळी वि. ( गो . ) विधवा झालेली . ०खांड स्त्री. स्त्रियांस लाववयाचा रांड , बाजारबसवी , बटीक इ० अर्थाचा अभद्र शब्द , शिवी . मी त्याची कांहीं गोष्ट बोलिलें नसतां उगीच मेला मला रांडखांड म्हणतो . [ रांड द्वि . ] ०गळा पु. १ टिपेचा सूर ; तृतीय सवन . २ बायकी आवाज . [ रांड ] ०गांठ स्त्री. विशिष्ट आकाराची गांठ ; ढिली गांठ . बाईलगांठ पहा . याच्या उलट पुरुषगांठ . गाणें , गार्हाणें - न . पिरपिर ; बायकी कुरकूर ; बायकी विनंति ; रडगाणें . ( क्रि० गाणें ; सांगणें ). रांडगो - पु . ( गो . ) वेश्येचा मुलगा , किंवा विधवेस अनीतीच्या मार्गानें झालेला मुलगा . ०चाल स्त्री. भित्रेपणा ; नामर्दपणा ; बायकीपणा . ०छंद पु. रांडीबाजीचा नाद ; रांडेचें व्यसन . ०छंदी वि. रंडीबाजीची संवय लागलेला ; रांडगा . ०तगादा पु. ( कुण . ) ( सार्याच्या किंवा कर्जाच्या ) पैशाची ( पिठया शिपायानें नव्हे ) कुळकडे सौम्य रीतीनें केलेली मागणी . ह्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यास आपणास मुखत्यारी आहे असें कुणबी मानतो . बडग्याच्या विनंतीशिवाय दुसर्या कोणत्याहि विनंतीस दाद न देण्याबद्दल हा वर्ग कित्येक पिढया प्रसिध्द आहे . कुणबी पहा . ०पण न. १ ( कों . ) वैधव्य . २ नाश ; नादानपणा . कां घेतां रांडपण ठरून भाऊ नाना । - ऐपो ११६ . ०पाटा पु. वैधव्य . ( क्रि० भोगणें ; येणें ; मिळणें ; प्राप्त होणें ; कपाळीं येणें ). [ रांड + पट्ट ] ०पिसा वि. रांडवेडा ; अतिशय रांडछंदी ; रंडीबाज ; बाईलवेडा ; स्त्रैण . ०पिसें न. रांडवेड ; रांडेचा नाद . ०पोर न. १ ( व्यापक ) बायकामुलांसह एखाद्या ठिकाणचे सर्व रहिवासी ; गांवांतल्या बायकापोरांसुध्दां सर्व लोक . आज कथेला झाडून रांडपोर आलें होतें . २ एखाद्याच्या पदरीं असलेलें . बायको , मुलें इ० कुटुंब , खटलें . ३ रंडकीचें मूल . ४ दासीपुत्र ; वेश्यासुत . [ रांड + पोर ] रांडपोर कीं राजपोर - रंडकीचा मुलगा किंवा राजाचा मुलगा हे दोघेहि अनियंत्रित व अशिक्षित असतात ; दोघेहि बेबंद व निर्धास्त असतात . ०पोरें अनव . घर , गांव , देश यांतील मुख्य कर्त्यापुरुषाहून इतर बायका , मुलें इ० सर्व माणसें . ०बाज वि. रंडीबाज ; बाहेरख्याली . [ हिं . ] ०बायल स्त्री. ( गो . ) विधवा स्त्री . ०बेटा पु. रांडलेक . तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेना कां । - तुगा २९८३ . ०बोडकी स्त्री. विधवा स्त्री . त्या रांडाबोडकीनें लन्न जुळलन् । - मोर ११ . ०भांड स्त्री. ( निंदार्थी ) रंडकी ; बाजारबसवी ; बटीक . [ रांड द्वि . ] ०भांडण न. १ बायकांचें भांडण . २ ( ल . ) बिन फायदेशीर , निरर्थक गोष्ट . ०भाषण न. बायकी , नामर्द , दीनवाणें भाषण . ०मस्ती स्त्री. १ पतिमरणानंतर विधवेस येणारा लठ्ठपणा व जोम . २ ( ल . ) नियंता नाहींसा झाल्याबरोबर एखाद्या माणसास येणारी टवटवी ; चपळाई , धिटाई . ०माणूस न. १ ( दुर्बलत्व दाखवावयाचें असतां ) स्त्री ; स्त्रीजाति ; स्त्रीमात्र . २ ( तिरस्कारार्थीं ) बुळा , निर्जीव , बायक्या मनुष्य ; भित्रा मनुष्य . [ रांड + माणूस ] ०मामी स्त्री. ( करुणेनें ) विधवा स्त्री . ०मांस न. ( निंदार्थी ) पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रियांस एकटें राहतां आल्यामुळें व मोकळेपणामिळाल्यामुळें कधीं कधीं येणारा लठ्ठपणा . ( क्रि० चढणें ; येणें ) [ रांड + मांस ] ०मुंड स्त्री. १ केशवपन केलेली , अनाथ व अनुकंप्या अशी विधवा . २ ( शिवी ) रांड ; बोडकी ; अकेशा थेरडी ; विधवा . [ रांड + मुंड ] ०रळी स्त्री. विधवा किंवा विधवेसारखी ; ( व्यापक . ) विधवा . रांडरळी म्हणती हा मेला बरें झालें [ रांड + रळी ] ०रागोळी स्त्री. ( व्यपक . ) रंडीबाजी व बदफैली . [ रांडद्वि . ] ०रांडोळी स्त्री. १ विधवा किंवा तिच्या सारखी स्त्री . रांडरळी पहा . २ शिंदळकी . ३ बायकांशीं संगत ठेवणें ; रंडीबाजी . ०रूं न. विधवा होईल यासाठीं लग्नाच्या वेळीं नवर्यानें तिच्या तुर्तदीकरितां दिलेलें वेतन ; बाइलवांटा ; रांडरोटयाची चाल मुख्यत्वें गुजराथेंत आहे . [ हिं . ] ०रोटी स्त्री. लढाईत पडलेल्या किंवा सरकारकामीं आलेल्या माणसाच्या बायकोस निर्वाहकरितां दिलेली जमीन इ० . [ हिं . ] ०लेंक ल्योंक - पुन . १ रंडापुत्र ; विधवेचा मुलगा ; एक शिवी . काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका । २ ( व . ) मेलें या शब्दाप्रमाणें वाक्याच्या आरंभीं किंवा मध्यें निरर्थक योजतात . आम्हास नाहीं रांडलोक असं येत ! ०वडा पु. सर्व बायकामाणसें ; घरांत सत्ताधारी पुरुष नसल्यामुळें होणारें स्त्रियांचें प्राधान्य . २ बाजारबसवी , रांड , बटीक इ० शब्दप्रचुर शिव्या ; शिवीगाळ ; गालिप्रदान . ( क्रि० गाणें ; गाजविणें ; ऊठवणें ) किती रांडवडे । घालुनि व्हालरे बापुडे । - तुगा २ . ७४६ . [ रांड + वाडा ] ०वळा पु. स्त्रियांच्या कडाक्याच्या भांडणांतील शिवी ; रंडकी , रांड , बटकी , बाजारबसवी इ० शिव्यांची माळका . ( क्रि० गाणें ; वाजवणें ). [ रांड + आवलि ] ०वांटा पु. वैधव्य . ०वांटा येणें - विधवा होणें . कपाळीं येणें - विधवा होणें . ०वाडा पु. कुंटणखाना ; वेश्यांची आळी . ०व्यसन न. रांडेचा नाद , छंद . ०व्यसनी वि. रांडबाज . ०सांध स्त्री. विधवेचा कोपरा . [ रांड + संधि ] ०सांधीस घरांत उदास होऊन बसणें ( रागानें एखाद्यास म्हणतात ). रांडक - वि . ( कों . ) विधवा झालेली . सडा मफलीस व रांडक बायको व भिकारी बैरागी हे निमदस्ती . [ रांड ] रांडका - पु . विधुर ; ज्याची बायको मेली आहे असा पुरुष . [ रांड ] रांडकी - स्त्री . विधबा . ( तिरस्कार दया दाखवितांना ). [ रांड ] रांडगा - वि . ( राजा , तंजा . ) रंडीबाज . २ - पु . ( बे . ) महार जातीचा बलुतेदार . याला वतन इनाम जमीन असते . याचा हक्क कर्णाटकांतील लक्ष्मीच्या जत्रेंत रेडा मारण्याचा असतो . हल्लीं ह्या शब्दास अपभ्रष्टता येऊन तो शिवीदाखल योजिला जातो . रांडरूं - न . ( तिरस्कारानें ) विधवा स्त्री . [ रांड ] रांडव - वि . १ रंडकी झालेली ; विधवा ( स्त्री ). २ बायकोच्या मरणानें उघडा झालेला ; मृतपत्नीक ; विधुर . [ रांड ] रांडवणें - अक्रि . विधवा होणें ; रांडावणें पहा . [ रांड ] रांडवा - स्त्री . विधवा स्त्री . रांडवा केलें काजळ कुंकूं । - एभा ११ . ९६६ . रांडा पोरें - नअव . १ कुटुंबांतील कनिष्ठ दर्जाचीं माणसें ( बायका , मुलें व कुणबिणी ). २ समाजांतील हलक्या दर्जाचे लोक . बसणें घरांत उदास होऊन बसणें ( रागानें एखाद्यास म्हणतात ). रांडक - वि . ( कों . ) विधवा झालेली . सडा मफलीस व रांडक बायको व भिकारी बैरागी हे निमदस्ती . [ रांड ] रांडका - पु . विधुर ; ज्याची बायको मेली आहे असा पुरुष . [ रांड ] रांडकी - स्त्री . विधबा . ( तिरस्कार दया दाखवितांना ). [ रांड ] रांडगा - वि . ( राजा , तंजा . ) रंडीबाज . २ - पु . ( बे . ) महार जातीचा बलुतेदार . याला वतन इनाम जमीन असते . याचा हक्क कर्णाटकांतील लक्ष्मीच्या जत्रेंत रेडा मारण्याचा असतो . हल्लीं ह्या शब्दास अपभ्रष्टता येऊन तो शिवीदाखल योजिला जातो . रांडरूं - न . ( तिरस्कारानें ) विधवा स्त्री . [ रांड ] रांडव - वि . १ रंडकी झालेली ; विधवा ( स्त्री ). २ बायकोच्या मरणानें उघडा झालेला ; मृतपत्नीक ; विधुर . [ रांड ] रांडवणें - अक्रि . विधवा होणें ; रांडावणें पहा . [ रांड ] रांडवा - स्त्री . विधवा स्त्री . रांडवा केलें काजळ कुंकूं । - एभा ११ . ९६६ . रांडा पोरें - नअव . १ कुटुंबांतील कनिष्ठ दर्जाचीं माणसें ( बायका , मुलें व कुणबिणी ). २ समाजांतील हलक्या दर्जाचे लोक . ०रोटा पु. विधवांनीं करावयाचें सामान्य आडकाम . ( दळण , कांडण , मोल मजुरी इ० ). रांडाव - वि . ( गो . ) विधवा . रांडावणें - अक्रि . १ विधवापणाच्या केविलवाण्या स्थितीस प्राप्त होणें . २ ( ल . ) फिसकटणें ; मोडावणें ; नासणें ; बिघडणें ; भंग पावणें ( व्यापार , मसलत , काम ) ( विशेषतः या लाक्षणिक अर्थानेंच हा शब्द योजतात ). त्याणीं मागें संसार चांगला थाटला होता पण थोरला भाऊ मेल्यापासून रांडावला . [ रांड ] रांडावा - स्त्री . ( माण . ) बालविधवा ; बालरांड . रांडरांड - स्त्री . १ रंडक्यांतली रंडकी ; अतिशय अनाथ व असहाय रंडकी . २ ( ल . ) नामर्द , बुळा , अपात्र , नालायक , मनुष्य . ३ पराकाष्ठेचा अनाथ किंवा निराधार मनुष्य . रांडुल - स्त्री . ( गो . ) ( अनीतीच्या मार्गानें ) विधवेस झालेला मुलगी . रांडूल - स्त्री . ( कों . ) विधवा स्त्रीला उपहासानें म्हणतात . रांडे - उद्गा . एक शिवी . भांडे तृष्णेसीं द्विज भारार्त , म्हणे यथेष्ट घे रांडे ! - मोअश्व ६ . ७५ . [ रांड , संबोधन ] रांडेचा - वि . रांडलोक . - उद्गा . आश्चर्यवाचक उद्गार . अग रांडेचें ! पांच वर्षांचें पोर पहा किंग कशी पोथी वाचतो . रांडेचा आजार - पु . गर्मी . रांडेच्या - उद्गा . ( प्रेमळ ) एक शिवी . आहा रांडेच्या ! ... - देप ६२ . रांडोळी - स्त्री . १ ( करुणेनें , तिरस्कारानें ) विधवा स्त्री . २ विधवेप्रमाणें वागणूक . ३ कुचाळी , थट्टा . करितां गोपिकांसी रांडोळी । - एभा ६ . ३६५ . ४ मारामारी ; कत्तल . निकरा जाईल रांडोळी । - एरुस्व ६ . ९ . ५ क्रीडा . ६ नाश . कीं भीष्मदेवें चरणातळीं । केली कामाची रांडोळी । - जै २४ . ७ [ रांड ] रांडया , रांडया राऊजी , रांडया राघोजी - वि . १ रंडीबाज ; रांडव्यसनी ; रांडछंदी . २ बायक्या ; बाइल्या ; नामर्द . ३ बाईलवेडा . ४ रांडयाराघोबा , रांडयारावजी , बायकांत बसून किंवा त्यांजबरोबर फिरून गप्पा मारण्यांत आनंद मानणारा ( मनुष्य ); गप्पीदास ; चुलमावसा . म्ह० रांडया रावजी आणि बोडक्या भावजी . [ रांड ] रांढरुं , रांढूं - न . ( तिरस्कारार्थी ) विधवा स्त्री . रांडरू पहा . [ रांड ]
|