मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय १ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय १ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत चतुर्थीतपोवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । शौनक म्हणती सूतासी । महोदरचरित्र कथिलेसी । शांतिप्रद मोहविनाशी । आम्हांसी महाप्राज्ञां तूं ॥१॥तें ऐकूनही तृप्ति न होत । पुनःपुन्हा पिऊन जैसें अमृत । याच्यासम अन्य नसत । ऐसा अनुभव आमुचा असे ॥२॥म्हणून गजाननाचेंही चरित । सांग विस्तारें आम्हांप्रत । सर्वज्ञ तूं महाभागा निश्चित । भाग्यवंत आमुच्या मतें ॥३॥मुद्गल दक्षांचा संवाद । सांग आम्हा तूं मानद । त्या सुबुद्धी ब्रह्मपुत्रें सुखद । पुढती काय विचारिलें? ॥४॥सूत म्हणती तें ऐकून । ऐक भार्गवा विप्रेन्द्रा महाज्ञान । गजाननाचें माहात्म्य गहन । ऐकलें तैसें सांगतों ॥५॥महोदराचें आख्यान ऐकून । नाना उपाख्यानयुक्त पावन । मोहनाशकर तें प्रसन्न । जाहला दक्ष अत्यंत ॥६॥पुनरपि मुद्गलास तो म्हणत । योगींद्रां वेदपारगाप्रत । विनयगुणानें युक्त । गणेशज्ञानी लालसा ज्यासी ॥७॥महोदराचें माहात्म्य ऐकिलें । तेणें मोदयुक्त चित्त झालें । आतां पाहिजे सांगितलें । गजाननाचें चरित्र तूं ॥८॥हा अवतार कोणत्या रुपांत । कोणतें हें ब्रह्म असत । तो देहधारी कां होत । कोणतें कार्य कोणते गुण ॥९॥हें सर्व तूं मुनिसत्तमा । सांग महामते मज अभिरामा । धन्य कथा शुभा निरुपमा । ही सर्व सांग आम्हां ॥१०॥पूर्व पुण्याच्या प्रभावें लाभत । संगत तुझी पुनीत । धन्य मी एक संसारांत । ऐकेन सारें मनोभावें ॥११॥सूत सांगती शौनकास । दक्ष म्हणे ऐसें मुद्गलास । तेव्हां त्या महायोग्यास निवेदित । भावज्ञ गाणपत्यपरायण ॥१२॥अरे बुद्धिमंता दक्षा महाभागा । धन्य होशील तूं जगा । यांत संशया न जागा । गणेशकथा तूं वाढविसी ॥१३॥ही योगदा कथा सांगेन । तुझ्या मनोभावें मी प्रसन्न । योगशांतिप्रद माहात्म्य पावन । सांगतों तुज गजाननाचें ॥१४॥तेच सांख्य ब्रह्म विदेह कथिती । योगीजन परम प्रीती । तेच हें गजानन मुख निश्चिती । ऐसे जाण तूं प्रजापते ॥१५॥बिंदुमात्रात्मक देह असत । सोऽहं हें वक्त्र ख्यात । त्यांचा अभेदभाव धारण करित । देहरुप तो गजवक्त्र ॥१६॥त्रिविधांत गणेश देव स्थित । तथापि जसे त्यांनी वर्णित । विदेह गजवक्त्र शोभत । सांख्यधारक वक्रतुंड ॥१७॥बोधत्याग होता करित । कोण संख्या महाभागा जगांत । ब्रह्माची तेणें सांख्य प्रकाशित । वेदांत नादब्रह्मरुपें ॥१८॥लोभासुर विनाशार्थ प्रकटला । गजानन जो देवांनी प्रार्थिला । विप्रांनी ज्यास प्रजानाथा प्रार्थिला । भक्तिलालस एकदन्त ॥१९॥चतुर्थी तिथीस माध्यन्हीं अवतरत । ती तिथि त्यास प्रिय असत । सूत म्हणती शौकनाप्रत । हें ऐकून दक्ष विचारी ॥२०॥ही चतुर्थी तिथि सांगसी । तिजविषयीं विशेष सांगा मजसी । शुक्ला कृष्णा या भेदासी । स्पष्ट करी तूम मुद्गलमुने ॥२१॥ही तिथि गणनाथाप्रत । कां जाहली प्रिय अत्यंत । पुनःपुन्हा शुभ हें व्रत । सांगितलें तुम्ही म्हणून प्रश्न ॥२२॥तरी चतुर्थींचे महिमान । सांगा सकल मजला महान । दक्षाचें हें वचन ऐकून । हर्षयुक्त झाला महामुनी ॥२३॥मुद्गल नंतर त्यास सांगती । चतुर्थी व्रताची कथा प्रीती । ती संक्षेपें तुज सांप्रती । सांगेन मीं शोनका ॥२४॥पूर्वी सृष्टे निर्माण करुन । ब्रह्मा लोकपितामह उन्मन । तेथ स्थित प्राण्यांच्या कालार्थ मन । एककेन्द्रित तें करी ॥२५॥नाना कार्ये सिद्ध होण्यास । हृदयीं चिन्ती गणपास । ध्यान धरुन करी प्रार्थनेस । तेव्हा नवल एक घडलें ॥२६॥त्याच्या शरीरांतून प्रकृति । महामाया जी व्यक्त झाला जगतीं । तिथींची ती जननी होती । चतुष्पदा कामरुपिणी ॥२७॥चतुर्हस्ता सुशोभित । ती चतुर्मुखयुक्त असत । तिज पाहून हर्षयुक्त । जाहला तें प्रजापती ॥२८॥नंतर ती त्यास नमून । जगदीश्वरा तोषवी स्तवून । नाना स्तोत्रांनी प्रसादन । घनःनिस्वन ती करी ॥२९॥प्रकृती म्हणे प्रजाप्रतीप्रत । तुझ्या अंगांतून निःसृत । मज जाण ब्रह्मांडनायका सांप्रत । आज्ञा करी जनका मज ॥३०॥मीं करीन जें सांगाल तें त्वरित । आपुली मी भावयंत्रित । स्थान भक्ष्यादी द्यावें मजप्रत । नाना भोगादिक प्रभो ॥३१॥मज दयासिंधो द्यावें समस्त । परमेश्वरा मी तुज नमत । तिचें हें वचन ऐकून म्हणत । ब्रह्मदेव प्रकृतीस ॥३२॥हे मानदे गणेशाचें चिंतन । करुन । निमीं सृष्टी परम । विचित्ररुपा प्रसन्न । तिजला मग दे षडक्षर मंत्र ॥३३॥गणेशाचा तो मंत्र मिळत । तदनंतर ती प्रणाम करित । विधिपूर्वक ब्रह्मदेवाप्रत । वनांत गेली तप करण्या ॥३४॥नासाग्र दृष्टी लावित । उग्र तप ती आचरित । गणेशास ध्यात हृदयांत । जप करी मंत्रोत्तमाचा ॥३५॥ऐसीं सहस्त्र वर्षें जात । तेव्हां गजानन प्रकट होत । महाभागेच्या समोर मोदयुक्त । भक्तवत्सल तिज म्हणे ॥३६॥वर माग महाभागे त्वरित । मनोवांछित जे असत । निराहार तपानें मुदित । संतुष्ट मीं तुज देईन ॥३७॥त्याचें तें वचन ऐकून । अत्यंत हर्षित ती त्यास नमून । स्तवन करी कर जोडून । भावभक्तीनें संपृक्त ॥३८॥मूषक वाहास मूषकध्वजास । स्वानंदपतीस गणपतीस । सिद्धिबुद्धिप्रदात्यास । सिद्धिबुद्धिविहारा तुज नमन ॥३९॥योगेशासी शांतिप्रदासी । योग्यासी सर्वादीसी । सर्वपूज्यासी भक्तपालकासी । ज्येष्ठराजाची वंदन ॥४०॥ज्येष्ठपतीसी ब्रह्मासी । ब्रह्मदात्यासी ब्रह्मपतीसी । सिद्धेश्वरासी देवपतीसी । दैत्यपतीसी नमन असो ॥४१॥चतुर्भुजासी हेरंबासी । परशुधारकासी निरंकुशासी । अंकुशधारकासी सृष्टिकर्त्यासी । रजोगुणप्रभावें, नमन ॥४२॥सात्त्विक गुणें पालनकर्त्यासी । तामसगुणें संहर्त्यासी । गणेशासी स्थावरासी । चरासी चराचरमया नमन ॥४३॥चराचरविहीनासी । बोधासी चतुर्विधस्वरुपासी । चतुर्विधसुखप्रदासी । स्वसंवेद्यासी नमन ॥४४॥चतुःसुखस्वरुपासी । विनायकासी सर्वनायकासी । गजाननासी देवासी । देवदेवेशा तुज नमन ॥४५॥काय स्तुती करु मी पामर । योगी वेदमुख्यही जेथ मानिती हार । ब्रह्मणस्पतिरुपा उदार । तू एक गणाध्यक्ष विश्वांत ॥४६॥तथापि तुझ्या दर्शनें प्रोत्साहित । मी अज्ञ तुझें स्तोत्र गात । त्यानें तुष्ट होऊन मजप्रत । दृढ भक्ती तुझी देई ॥४७॥ऐसी स्तुती करुन । गणेशास करी वंदन । तिज वरती उठवून । गणाधीश व्रतमातेस म्हणे तदा ॥४८॥वर माग महाभागे इच्छित । तो मी देईन सुप्रीत । भक्तीनें स्तोत्रें संतोषित । तुझें स्तोत्रें हें मज परिय ॥४९॥तुझी ही स्तोत्ररचना वाचील । अथवा जो ती ऐकील । तो सर्व इप्सित लाभेल । मनुष्यमात्र हें निश्चित ॥५०॥एकदा दोनदा वा त्रिकाल । वाचनें लाभेल फळ अमल । व्रती व्रताचें साफल्य विमल । यांत संशय कांहीं नसे ॥५१॥ऐसें गणनाथ सांगत । तेव्हां गंभीर स्वनें ती प्रार्थित । प्रणाम करुन तयाप्रत । अश्रुपूर्ण नेत्रभावोत्कट ॥५२॥वरद जरी गणाधीशा मजप्रत । करी स्थरी भक्ति तुझी चित्तांत । सामर्थ्य दे माझ्या कार्यांत । करुणानिधे सर्वदा ॥५३॥सृष्टिनिर्माणाचें सामर्थ्य अद्भुत । द्यावें मज गणनाथा सतत । तुझीं प्रिय होऊन जगांत । विरह तुझा न व्हावा ॥५४॥तथास्तु गणाधीश म्हणत । चतुर्विधप्रदा तूं जगांत । मजला प्रिय अत्यंत । होशील तूं निस्संशय ॥५५॥तिथींच्या मातृभावें ख्यात । चतुर्थी नामें तूं जनांत । वामभागी कृष्णा असत । शुक्ला सदा दक्षिण भागीं ॥५६॥माझी जन्म तिथी होशील । तुझें व्रत जे पाळतील । त्या सर्वांस लाभेल । संरक्षण माझें निश्चित ॥५७॥माझ्या व्रतजा पुण्यक्ती ख्यात । व्रतांत तुजसम व्रत नसत । फलदायक तिथी तूं सर्वांत । श्रेष्ठ उत्तम होशील ॥५८॥ऐसें बोलून गजानन । त्वरित पावले अन्तर्धान । व्रतमाता प्रजानाथा ती महान । राहिली चिंतनीं निमग्न ॥५९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते चतुर्थीतपोवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP