बायांची गाणी - भुर्या म्हशी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
कान्हा भुर्या भुर्या म्हशी
कान्हा भुर्या भुर्या म्हशी
शिंगा उधळतील माती
कान्हा पारूका बांधती
कान्हा पारावती उभा
हाका मारी वाघोवा
तुझा रस्ता चोखट करा
तुझा शिवार चोखट करा
तुझा नगर चोखट करा
भरना बायाचा का आला
भरना देवीचा का आला
हाका मारती गावदेवी
हाका मारती जरीमरी
तुझा शिवार चोखट करा
तुझा नगर चोखट करा
भरना बायाचा का आला
भरना देवीचा का आला
कान्हा भुर्या भुर्या म्हशी
कान्हा भुर्या भुर्या म्हशी
शिंगांनी उधळतील माते
...कान्हा पार बांधतो
कान्हा पारावर उभा
त्याल हाका मारी देव वाघोबा
तुमचा रस्ता स्वच्छ करा
तुमचे शिवार स्वच्छ करा
तुमचे नगर स्वच्छ करा
फेरी बायांची ही आली
फेरी देवींची ही आली
हाका मारते गावदेवी
हाका मारते जरीमरी
तुमचे शिवार स्वच्छ करा
तुमचे नगर स्वच्छ करा
फेरी बायांची ही आली
फेरी देवींची ही आली
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP