बायांची गाणी - मोत्यांचा चेंदू
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
मोत्यांचा चेंदू
थुईथुई पाऊस पडे बाया पिकेले उंबराखाली
पिकेले उंबराखाली बाया हे जागा चोखाटेली
जागा चोखाटेली ही बाया शेला आथरेला
शेला आथरेला बाया डाव असा मांडेला
मोत्या का बाहुल्याचा चेंदू मढवीला
चेंदू मढवीला बाया गरागरा फ़िरवेला
गरागरा फ़िरवेला बाया आकाशी फेकीला
सूर्या बोले चांदाला आपल्या वरत कोणू आला
तेवढाच आई गेला न् चेंदू मागे पराटेला
मागे पराटेला न चेंदू करंजोल्या जालीत
करंजोल्या जालीत होता जंबू माली
होता जंबू माली माल्याने लावील्या मखमली
लावीच्या मखमली शिपना घालतो वेलोवेली
घालतो वेलोवेली कल्या आल्यात देठोदेठी
आल्यात देठोदेठी कल्या तोडीतो तडातोडी
तोडीतो तडातोडी येण्या गुंफ़ीतो धडाधडी
गुंफ़ीतो धडाधडी येण्या लाडूक्या बायाला
लाडूक्या बायाला येण्या लाडूक्या देवीला
मोत्यांचा चेंदू
थुईथुई पाऊस पडतो देवी, पिकल्या उंबराखाली
पिकल्या उंबराखाली, देवी, ही जागा स्वच्छ केली
जागा स्वच्छ केली ही, देवी, शेला अंथरला
शेला अंथरला, देवी, डाव असा मांडला
मोत्यांचा-तारांचा चेंडू मढवला
चेंडू मढवला, देवी, गरगर फ़िरवला
गरगर फ़िरवला, देवी, आकाशी फेकला
सूर्य म्हणे चंद्राला आपल्या वरती कोण आला
तितक उंच गेला न् चेंडू मागे परत आला
मागे परतला न् चेंडू पडला करंजाच्या जाळीत
करंजाच्या जाळीत होती जंबू माळी
होता जंबू माळी, माळ्याने जागा स्वच्छ केली
जागा स्वच्छ केली माळ्याने झेंडूच्या बिया लावल्या
बिया लावल्या माळ्याने, पाणे शिंपतो वेळोवेळी
पाणी शिंपले वेलोवेळी कळ्या आल्या देठोदेठी
आल्या देठोदेठी कळ्या तोडतो तडतडा
तोडतो तडतडा कळ्या गुंफ़तो धडाधडा
तोडतो धडधडा वेण्या लाडक्या बयेसाठी
लाडक्या बयेसाठी वेण्या लाडक्या देवीसाठी
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP