बायांची गाणी - कान्हा गेला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
कान्हा गेला
कान्हा गेला डोफ़्याएवढे पान्या रं
कान्हा घाली कंबलाला हातू रं
कंबल गेला दूरच्या काठूरी रं
कंबल गेला राज्या नगरपूरी रं
कान्हा तुझी सवतां सांभाल रं
कान्हा तू सतवांचा धनी रं
कान्हा तू यसवांचा धनी रं
कान्हातुला भूतानी वेटला रं
कान्हा तुला खैसानी वेटला रं
कान्हा तुझी सतवां कुठं गेली रं
कान्हा तुझी यसवां कुठं गेली रं
कान्हा गेली कंबरंएवढे पान्या रं
कान्हा घाली कंबलाला हातू रं
कंबल गेला दूरच्या लाठूरी रं
कंबल गेला राज्या नगरपूरी रं
कान्हा तुझे नडग आडवी झाली रं
कान्हा तुझे वाघोबा आडवा झाला रं
कान्हा तुझी सतवां कुठं गेली रं
कान्हा तुझी यसवां कुठं गेली रं
कान्हा गेली गल्याएवढे पान्या रं
कान्हा घाली कंबलाला हातू रं
कंबल गेला दूरच्या लाठूरी रं
कंबल गेला राज्या नगरपूरी रं
कान्हा तुझे गावदेवी आडवी झाली रं
कान्हा तुझे जरीमरी आडवी झाली रं
कान्हा तुझी सतवां कुठं गेली रं
कान्हा तुझी यसवां कुठं गेली रं
(कंबल-कमळ, सतवां-सत्व देणारी देवती, यसवां-यश देणारी देवता)
कान्हा गेला
कान्हा गेला गुडघ्याएवढ्या पाण्यात रे
कान्हा घाली कमळाला हात रे
कमळ गेले दूरच्या काठावरी रे
कमळ गेले राज्या-नागपुरी रे
कान्हा तुझी सत्वदा देवी सांभाळ रे
कान्हा तुझी यशदा देवी सांभाळ रे
कान्हा तू सत्वदेचा धनी रे
कान्हा तू यशदेचा धनी रे
कान्हा तुला भुताने वेढले रे
कान्हा तुला खवीसीने वेढले रे
कान्हा तुझी सत्वदा कुठे गेली रे
कान्हा तुझी यशदा कुठे गेली रे
कान्हा गेला कंबरेएवढ्या पाण्यात रे
कान्हा घाली कमळाला हात रे
कमळ गेले दूरच्या काठावरी रे
कमळ गेले राज्या-नागपुरी रे
कान्हा तुला नगड आडवी आली रे
कान्हा तुला वाघोबा आडवा आला रे
कान्हा तुझी सत्वदा कुठे गेली रे
कान्हा तुझी यशदा कुठे गेली रे
कान्हा गेला गळ्याएवढ्या पाण्यात रे
कान्हा घाली कमळाला हात रे
कमळ गेले दूरच्या काठावरी रे
कमळ गेले राज्या-नागपुरी रे
कान्हा तुला गावदेवी आडवी आली रे
कान्हा तुला जरीमरी आडवी आली रे
कान्हा तुझी सत्वदा कुठे गेली रे
कान्हा तुझी यशदा कुठे गेली रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP