बायांची गाणी - आहेरू
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
आहेरू
बांधावरले बोरी गं तुझी बांधोबांधी मुलां गं
बांधावरले बोरी गं तुझी हिरवी पिकली पानां गं
हिरवी पिकली पानां गं तुझी राती चोखी फ़ुलां गं
राती चोखी फ़ुलां गं तुझी लांबीलिंबी बोरां गं
सोनार मैतर बायांच्या लगीनाला येती गं
लगीनाला येती गं काय आहेरू करती गं
आहेरू करती गं काय झांजूराचा लोणा गं
आहेर
बांधावरच्या बोरी ग तुझी बांधोबांधी मुळे ग
बांधोबांधी मुळे ग तुझी हिरवी पिवळी पाने ग
हिरवी पिवळी पाने ग तुझी स्वच्छ चांदणफ़ुले ग
सोनार-मित्र देवीच्या लग्नाला येती ग
लग्नाला येती ग काय आहेर करती ग
आहेर करती ग काय घुंगरांचे लेणे ग
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP