बायांची गाणी - कडेलोट
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
कडेलोट
एका धोतराची कहानी गं
बाया माझ्या नेसल्या सात जनी गं
सातजनी लेकी रं बापा
पोसशी कशावरी रं बापा
पोसीन पोसीन गं लेकी
कनी कोंड्यावरी गं लेकी
नाय पोसवल्या झाल्या बापानी धरील्या मनगटी
नेल्या दरियाकडे बापानी कडेलोट केला
बुडल्या बुडनारनी गं
बाया माझ्या तरल्या तरनारनी गं
पोवत पोवत बाया गेल्या उंबराच्या बनी गं
उंबरेदादाला सरापू दिला बायांनी गं
अस्वीन कार्तिकाला उंबरा खराटा होशिला रं
मगशिर पुसा उंबरा घवाघवा होशीला रं
वारली कोलीयांचा लग्नाला मुल्हेरा होशिला रं
कडेलोट
कहाणी ऐका
एक धोतर-नेसल्या सात जणी ग
सात लेकींच्या बापा, लेकी कशावर पोसशील रे
सात लेकी पोशीन मी कनीकोंड्यावर ग
जमले नाही पोसणे तेव्हा बापाने मनगटी घरली
दर्यामध्ये साती लेकींना टाकून दिले ग
बुडाणार्या बुडाल्या त्यातील तरणार्या तरल्या ब्ग
उंबरेदादाला त्यांनी शाप दिला ग
अश्विन-कार्तिकाला उंबरा खराटा होशील रे
मार्गशीर्ष पौषामध्ये डवरून येशील रे
वारली कोळ्यांच्या लग्नात मुळारी होशील रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP