बायांची गाणी - जंबू बेटामधी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
जंबू बेटामधी
वाटंवरले गं तुझी
लांबलिंब बोरां लांबलिंब बोर
बामनाचे मुली गं तुवं राजं वरू येती
राजं वरू येती तुवं साखरपुडं खाती
बिजंच्या हलदी, हलदी तुझ्या
तिजंची तेलना, तेलना तुझी
चौथीची लग्नाना,लग्नाना तुझी
लग्नाना लागती ग तुझी
जंबू बेटामधी, जंबू बेटामधी
जंबू बेटावर
वाटेवरच्या बोरी ग तुझी
मोठी टपोरी बोरे ग
ब्राह्मणच्या मुली ग तुला राजाची मागणे येते
राजाची मागणी येते ग तुझा साखरपुडा होतो
बिजेला लागते हळद तुला
तिजेला होते तेलवाण
चवथीला लगते लग्न तुझे
लग्न लागते ग तुझे
जंबू बेटावर
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013

TOP