तुलसी तुझा जनम
तुलसी, तुलसी तुझा जनम कुठे झाला, काय गं
जनम माझा झाला एका माल्याच्य मल्यात, काय गं
सोनियाची कुदल तिला रूपियाचा दाडा, काय गं
कुदलीने खणिला रोपा परडीनी घेतला, काय गं
परडीनी घेतला रोपा डोक्यावरी ठेवला, काय गं
डोक्यावरी ठेवला रोपा घरापाशी आणला, काय गं
घरापाशी आणला त्याला जागा चोखटेला, काय गं
जागा चोखटेला त्याला खड्डा खणियेला, काय गं
खड्डा खणियेला टाकली पाच अंगुली पाणी,काय गं
पाच अंगुली माती टाकला पाच अंगुली पाणी, काय गं
पाच अंगुली पाणी टाकला रोपा ग वाढेला, काय गं
सात जणी बाया बहिणी पूजा या करीती, काय गं
तुळशी तुझा जन्म
तुळशी, तुळशी तुझा जन्म कोठे झाला ,
जन्म माझा झाल एका माळ्याच्या मळ्यात, काय ग
सोन्याची कुदळ, तिला चादीचा दांडा, काय ग
कुदळीने खणले रोप, परडीत घेतले, काय ग
परडीत घेतले रोप, डोक्यावर ठेवले, काय ग
डोक्यावर ठेवले रोप, घरापाशी अणले, काय ग
घरापाशी आणले, त्याच्यासाठी जागा स्वच्छ केली, काय ग
जागा स्वच्छ केली, त्याच्यासाठी खड्डा खणला, काय ग
खड्डा खणला, टाकली पाच ओंजळी माती, काय ग
पाच ओंजळी माती, टाकले पाच ओंजळी पाणी, काय ग
पाच ओंजळी पाणी टाकले, रोप ग वाढले, काय ग
सात जणी देवी बहिणी पूजा या करती, काय ग