वारांची गीते - श्रीरामनवमीची उत्सवपद्धति

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


१. पूर्वदिवशीं सर्व तयारी करावी.
२ पहांटेस भूपाळ्या झाल्यावर दार उघडावें, तिलकधारण, कांकडआरती हुद्यांसहित, कांकडआरती झाल्यावर सुवासिनीमकडून पंचारती करणे. हुद्यांचा तपशील : - मोरचेलें २, चवर्‍या २, रुमाल २, धनुष्यें २, दिवटया २, काठया २, अबदागिरी २, छत्र १ याप्रमाणें मध्यान्हकाळीं, सायंकालीं व कथेचे अंतीं.
३ पूजेचे आरंभीं ध्वज लावावा व उत्साहमूर्ति मारुतीची आणावी व गांवांत नऊ दिवस अक्षत देणें, नैवेद्याचें सामान दररोज रुजूं करणें, रांगोळी गालिचा काढणें.
४. नित्य पूजा, रामायण संहिता वाचणें, आरती छबीना, गांवच्या मारुतीस नेणें व प्रदक्षणा तेरा करणें. त्या करते वेळीं आरत्या तेरा म्हणाव्या त्या १ गणपतीची, २ वेदमातेची, ३ सद्‍गुरूची, ४ श्रीरामाची, ५ मारुतीची, ६ शंकराची, ७ राधारमणाची, ८ नारायणाची, ९ विठोबाची, १० कृष्णेची, ११ विश्वभरितेची, १२ व्यंकटेशाची, १३ मारुतीची याप्रमाणें आरत्या करणें.
नंतर तीर्थ व पुराण, वसंतपूजा, महानैवेद्य, ब्राह्मणभोजण.
५ सायंकालीं करुणाष्टकें, पंचपदी, सवाया, आरती, छबीना, कौल, मनाचे श्लोक २१ व दासबोध दशक चवथा यांतील एक समास क्रमानें वाचणें. कीर्तन झाल्यानंतर प्रसाद वाटणें, व पुढें मानाचे विडे प्रत्येक दिवशीं वाटणें.
६ जन्मदिवशीं पुराण, पुराण झाल्यानंतर कीर्तनाचा जन्म करावा.
७ दशमीस आरतीच्या पूर्वी भिक्षा करावी.
८ एकादशीस सूर्योदयीं रथोत्सव नंतर लळित, राज्याभिषेक वर्णन करणें, तीर्थप्रसाद उभें राहून घ्यावा.
९ माघ वद्य नवमीस याप्रमाणेंच पुराण सुंदरकांड, दशमीस रथ.
१० हनुमानजयंतीस सूर्योदयीं जन्म व पूजा नैवेद्य गूळ फुटाणे.
यांचा व महानैवेद्य दहीं वडे यांचा.

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP