मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|निरनिराळ्या वारांची गीतें| पाळणा निरनिराळ्या वारांची गीतें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग ज्ञानपर अभंग वैराग्यपर अभंग करुणापर धांवा भजनांचा उपसंहार विडा सेजारती श्लोक प्रार्थनेचे श्रीरामनवमीची उत्सवपद्धति कौल नवविधाभक्तीचे अभंग न्हाणी पाळणा वारांची गीते - पाळणा समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगपाळणारामदाससमर्थ पाळणा Translation - भाषांतर हळूहळू गाई निजरे बाळा । मोठा जटाधारी गोसावी आला । खरचरभूजा जारे फकीरा । निजला माझा पालखीं हीरा । हळूहळू गा० ॥१॥नको येउंरे बागुलबावा । निजला माझा पालखीं रावा । सगुण गुणाचें बाळक माझें । कोणी दावा हो यासम ये दुजें । हळूहळू गा० ॥२॥लागली दृष्टि कोण्या पापिणीची । उतरे प्रभा मुखचंद्राची । हालवी कौसल्या प्रेमपान्हा । दास म्हणे आला वैकुंठराणा । हळूहळू गा० ॥३॥॥ जोजोजोजोरे श्रीरामा । निजसुखगुण विश्रामा । जोजो० ॥ध्रु०॥ ध्याती मुनि योगी तुजलागीं । कौसल्या वोसंगीं । जोजो० ॥१॥वेदशास्त्रींची मति जाण । स्वरूपीं झाला लीन ॥ जोजो० ॥२॥चारी मुक्तींचा विचार । चरणीं पाहाती थोर ॥ जोजो० ॥३॥भोळा शंकर निशिदिनीं । तुजला जपतो मनीं । जोजो० ॥४॥दास गातसे पाळणा । राम लक्षुमणा ॥ जोजो० ॥५॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP