मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|निरनिराळ्या वारांची गीतें| बुधवार निरनिराळ्या वारांची गीतें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग ज्ञानपर अभंग वैराग्यपर अभंग करुणापर धांवा भजनांचा उपसंहार विडा सेजारती श्लोक प्रार्थनेचे श्रीरामनवमीची उत्सवपद्धति कौल नवविधाभक्तीचे अभंग न्हाणी पाळणा वारांची गीते - बुधवार समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ बुधवार Translation - भाषांतर ॥ अभंग ॥ येथें उभा कां श्रीरामा । मनमोहन सेघश्यामा ॥धुर०॥ काय केली सीताबाई । येथें राही रखुमाई ॥१॥काय केली अयोध्यापुरी । तेथें वसविली पंढरी ॥२॥काय केली शरयू गंगा । येथें आणिली चंद्रभागा ॥३॥धनुष्य बाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥४॥काय केलें वानरदळ । येथें मिळविले गोपाळ ॥५॥रामीं रामदासीं भाव । तैसा होय पंढरिराव ॥६॥॥ अभंग ॥ राम कृपाकर विठ्ठल साकार । दोघे निराकार एकारूपें ॥१॥आमुचिये घरीं वस्ती निरंतरीं । हदयीं एकाकारी । राहियेलें ॥२॥रामदास म्हणे धरा भक्तिभाव । कृपाळू राघव पांडुरंग ॥३॥जयजय पांडुरंग हरी ॥॥ अभंग ॥ रामचरणाचा हाचि भावो । भक्तां दाखवावया ठावो । उभें राहाया अभि-प्रावो । भक्त खांद्या ध्यावया ॥१॥विठोबा हे आमुची जननी । भीमातरिनिवासिनी । भक्त पुंडलिकालागुनी । वैकुंठींहुनि पातली ॥२॥श्रीवत्साची हे खूण । तें भक्ताचें कृपा.दान । आजानुबाहू यालागृन । भक्तां आलिंगन द्यावया ॥३॥शोभे सुहास्यवदन । नाभी नाभी हें वचन । पूर्ण आकर्णनयन । साधुजन पहाया ॥४॥मुकुटी मयूरपत्रें त्रिवळी । विट नीट असे ठाकली । रामदासाची माउली । भक्तालागीं उभी असे ॥५॥॥ आरती ॥ निर्जरवर स्मरहरधर भीमातिरवासी । पीतांबर जघनीं कर दुस्तर भव-नाशी । शरणागत वत्सल पालक भक्तांसी । चाळक गोपीजनमनमोहन सुखरासी । जयदेव जयदेव जय पांडुरंगा । निरसी मम संगा नि:संगा भवभंगा ॥ जय० ॥१॥आणिमा लधिमा गरिमा नेगति तव महिमा । नीलोत्पलदलविमला घननिलतनु श्यामा । कंटकभंजन साधू-रंजन विश्रामा । राघवदासा विगलितकामा नि:कामा ॥ जय० ॥२॥ ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP