श्रीवेंकटेशाचीं पदें

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद २४. वें.
श्रीवेंकटरमणा संकटहरणा करितों वंदना । प्रेमें करितों वंदना ॥ धृ० ॥
तूं एकचि तारक साचा । प्रतिपालक निजभजकांचा । चालक तैसा त्रिजगाचा । हे वाचा रमवुनि नामिं भवाच्या तोडीं बंधना ॥ श्रीवेंकट० ॥१॥
निर्विकार मुळिंचा होसि । परि घेउनि अवतारासि । निजभक्तजना सुखदेसि । नाशी दुरित तें करुनि सकल दुष्टांच्या कंदना ॥ श्रीवेंकट० ॥२॥
ह्रदयांत स्फुरत सुख तो तूं । जो व्यापक निज निहेंतु । तव नाम भवजलधि सेतु । हें गुह्य परम गुरुराज कथित कृष्णाच्या नंदना ॥ श्रीवेंकटरमाणा संकटहणा करितों वंदना ॥३॥
पद २५. वें.
वेंकटेश क्लेश हरुनि तो परेश सुखवी मजला । घेउनियां नानारूपें भक्त कार्य करण्या सजला ॥ धृ० ॥
सगुणमूर्ति पाहुनीयां अंतंरग प्रेमें भिजला । न बोलवे सुख तें वदनिं सख्या काय सांगूं तुजला ॥ वेंकटेश० ॥१॥
श्रीभूदेवि दक्षिण वामीं विराजती ज्याच्या विमला । कृष्णतनय वंदुनि चरणा जन्ममरण हरण्या भजला ॥ वेंकटेश० ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP