शांतादुर्गेचें पद
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद २८. वें.
देवि जननि असुर हननि पदरिं घे मला ॥ धृ० ॥
हरुनि मन मला, शरण पदतला ॥ देवि० ॥
करुनि दया या समया सुपथ दाविला । दिवस हा भला, मजसि लाभला ॥ दे० ॥१॥
मरण जनन हरण तुझ्या चरणिं लागला । स्वसुख जोडिला, बंध तोडिला ॥ दे० ॥२॥
अशुभ नुरवि सुजन उरवि, पुरविं हेतुला । लाज हे तुला, संतसेतुला ॥ दे० ॥३॥
कृष्णनयन धरुनि विनय नमन करि जिला । ग्राम देविला, सुमन सेविला ॥ देव ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2014
TOP