श्रीमल्लिकेशाचें पद
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद २९ वें.
यारे पाहुं चला मल्लिकेश सदयाला । भक्तांसाठीं जो जाला प्रभु उदयाला । तारिल निश्चय हा सत्यचि गमत मनाला । आत्म जनाला ॥ धृ० ॥
प्रेमें जे भजती मजला त्यां पदिं थारा । देउनि उद्धरिं मी वारुनियां जडभारा । जे नर कपटी त्यां घेउनियां अवतारा ॥ चाल ॥
करितों शिक्षा मी समजवि हें सकळांला । प्रत्यय आला ॥ या० ॥१॥
ज्यां निजभजनाची आवडि मानसिं मोठी । दासां त्यां नुरवी भव दु:खाच्या कोटी । सायुध संरक्षी राहुनि पाठि पोटीं ॥ चाला ॥
यास्तव चालविलें कीर्तन सप्ताहाला । व्या लाभाला ॥ या० ॥२॥
चक्षू गुण गज भू शक साधारण नामें । वर्षीं आषाढीं कृष्णाष्टमिला प्रेमें । केलें आरंभा या देवालयिं नेमें ॥ चाल ॥
श्रीमद्गुरुवारीं करुनि नाम गजराला ॥ स्मरुनि चरणाला ॥ या० ॥३॥
सातचि वर्षे ही सेवा कीं न करावी । नित्यचि भजनाच आवड पोटीं धरावी ॥ गिरिजानाथाची चिन्मय मूर्ति वरावीं ॥ चाल ॥
पावन नाम खरें नुरवि कामलेशाला ॥ सुखधामाला ॥ या० ॥४॥
जय जय राम हरे कृष्ण हरे गोविंदा । संगें सुजनाच्या नित्यचि हा करुं धंदा । मिळुनि सर्व आम्हीं सेवुं परमानंदा ॥ चाल ॥
सनकादिक तरले धरुनि या मार्गाला ॥ जिव हा धाला ॥ या० ॥५॥
नामस्मरणाचा महिमा फारचि मोठा । स्मरत्यां संसारीं परमार्थीं नच तोटा । बोला विश्वासें जाळिल दुष्कृत कोठा ॥ चाला ॥ आला येत असे अनुभव कृष्ण सुताला ॥ कथित सुजनाला ॥ या० ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2014
TOP