श्रीदामोदराचें पद

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद २६. वें.
देइं स्मरण चरणाचें, सदया तुज मी मागत साचें ॥ धृ० ॥
श्रीदामोदर नाम निरंतर, गातों धाम सुखाचें ॥ दे० सदया० ॥१॥
या संसारीं श्रमलों भारीं, वारीं ताप मनाचे ॥ दे० सदया० ॥२॥
क्षण न मला विश्रांति खचित, भय वाटे फार भवाचें ॥ दे० सदया० ॥३॥
गृह धन दारा सर्व पसारा. पाहुनियां मी नाचें ॥ सदया० ॥४॥
पूर्ण्विचारें पाहतां संकटिं, कोणि न हे कामाचे ॥ सदया० ॥५॥
अद्वय परपानंदीं मिळवी, मन हें कृष्णसुताचें ॥ सदया० ॥६॥


References : N/A
Last Updated : June 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP