श्री रवळनाथाचें पद
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद ४०. वें.
श्रीरवळनाथाच्या चरणीं माथा, ठेवितो तुझा दास पहा ॥ बहुत त्रास मज देति पहा हे काम क्रोधादीक साहा ॥ धृ० ॥
वारुनियां ते कृपाद्दष्टिनें, करुनी ठेवीं तव चरणीं । कष्ट नसे तुज स्पष्ट सांगतों. न कळे देवा तुझी करणी ॥ श्रीरव० ॥१॥
झडकरिं येसी धांवुनि तूं प्रभु, भक्तांसी संकट पडतां । संसृति पारावारीं बुडतों, तुजविण नाहीं मज त्राता ॥ श्रीरव० ॥२॥
नाना अवतारांतें घेउनि, भक्तांसी तूं रक्षितसे । कृष्ण सुत म्हणे अतिप्रेमानें, मन्मुक्ति त्वत्पदीं जाण असे ॥ श्री रवळनाथा० ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2014
TOP