संत नरहरी सोनार यांच्या स्मृतीत चोखामेळा
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
१) धन्य पुंडलिक भक्त निवडला । अक्षयीं राहिला चंद्रभागीं ॥१॥
भक्त नामदेव अक्षयी जडला । पायरी तो झाला महाद्वारीं ॥२॥
ज्ञानोबा सोपान निघती हे भक्त अक्षयी राहत परब्रम्ही ॥३॥
बोधराज भला वचनीं गोविला । कीर्तनी राहिला पांडुरंग ॥४॥
साधुसंत फार येती थोर थोर । उभा निरंतर चोखामेळा ॥५॥
साधु संत जन वंदिती चरण । नरहरी निशिदिन सेवेलागी ॥६॥
२) पंढरपुरचा जाणा विठ्ठल धणी । राणी रुक्मिणी सत्यभामा ॥१॥
भूमीमध्ये गुप्त कानोपात्र झाली । उजवे बाजू ठेली लक्ष्मी ते ॥२॥
पुढें हो प्रतिमा नामदेव पायरी । उभा महाद्वारीं चोखामेळा ॥३॥
पुढे मल्लिकार्जुन महिमा असे फार । लिंग असे थोर महादेवाचे ॥४॥
पुढें भागीरथी मध्यें पुंडलिक । आणिक ही तेथें वेणूनाद ॥५॥
आषाढी कार्तिकी साधु संत येती । गोपाळकाला करिती आनंदानें ॥६॥
देवाचे समोर नरहरी सोनार । ह्रदयी निरंतर नांव घेतो ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP