मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|संतांच्या स्मृतीत चोखामेळा|

स्वामी स्वरूपानंद यांच्या स्मृतीत चोखामेळा

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


अनंत ब्रम्हांडे साठविसी पोटीं । तो तूं भक्तिसाठी विकलासी ॥१॥
काय नेणों तुज बक्ति कां आवडे । अर्जुनाचे घोडे खाजविसी ॥२॥
कां गातूं बळीचा होसी द्वारपाळ । रानीं धुव बाळ सांभाळिसी ॥३॥
होसी विठ धेड फेडिसी तूं देणें । दामाजी कारणें धांव घेसी ॥४॥
एकनाथा घरी वाहसी कां पाणी । शेले कोण विणी कबिराचे ॥५॥
चोखामेळ्या संगे कोण गुरें ओढी । डेरे कोण घडी गोरोबाचे ॥६॥
जनाबीसंगे कोण दळूं लागे । आवडीनें सांगे गुज गोष्टी ॥७॥
स्वामी म्हणे देवा तूंचि विश्वंभर । भक्तांचा चाकर स्वय होसी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP