मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|संतांच्या स्मृतीत चोखामेळा|

स्तुतिपर अभंग - अभंग १ ते ५

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


१) चांभार सब कुच जाणे । कटोर गंगा देख ॥२५॥
सेना नानक पूजा करितां । देवनें धोकटी लिया देख ॥२६॥
चोखोबानें देव वतलाया । शिवाय पकडी देख ॥२७॥
ऐसें नानक बहुत हुवे । अंत न लगे देख ॥२८॥
ऐसें नानक नाम जपके । वैकुंठ जावें देख ॥२९॥
कासी गया प्रयाग गया । कर्वत लिया देख ॥३०॥
मथुरा गया द्वारका गया । छापा लिया देख ॥३१॥
उसका नाम लेवे नहीं तो । दोष लागे देख ॥३२॥
उसका नाम जपके । वैकुंठ चढे देख ॥३३॥
एकनाथ तो एकही जाने । एका जनार्दनीं देख ॥३४॥

२) भोळा देव भोळा देव । उंच नीच नेणें भाव ॥१॥
चोखियाच्या मागें धांवे । शेले कबिराचे विणावे ॥२॥
खुरपूं लागे सांवत्यासी । उणे येवो नेदी कोणीसी ॥३॥
विष पिणें धाउनी जाणें । भाविकाची भाजी खाणें ॥४॥
कण्याची तो आवडी मोठी । एकाजनार्दनी लाळ घोटी ॥५॥

३) ज्ञानराजासाठी स्वयें भिंत वोढी । विसरूनी प्रौढी थोरपण ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । कट धरूनी करी तिष्ठतसें ॥२॥
नामदेवासाठीं जेवी दहींभात । न पाहे उचित आन दुजें ॥३॥
गोरियाचे घरी स्वयें मडकीं घडी । चोखियाची वोढी गुरेंढोरे ॥४॥
सांवत्या माळ्यासी खुरपूं लागे अंगें । कबीराचे मागे शेले विणी ॥५॥
रोहिदासासवें चर्म रंगूं लागे । सजन कसायाचे अंगें मांस विकी ॥६॥
नरहरी सोनारा घडू फुंकूं लागे । दामाजीचा वेगें पाडीवार ॥७॥
जनाबाई साठी वेचितसे शेणी । एका जनार्दनी धन्य महिमा ॥८॥

४) खुर्पू लागे सांवत्यासी । न पाहे यातीसी कारण ॥१॥
घडी मडके कुंभाराचे । चोख्यामेळ्याचीं ढोरें वोढी ॥२॥
सजन कसायाचे विकी मांस । दामाजीचा दास स्वये होय़ ॥३॥
एका जनार्दनी जनीसंगे । दळूं कांडू लागे आपण ॥४॥

५) नामपाठे तरला चोखा तो महार । भावें सर्वेश्वर स्थापी तया ॥१॥
नामपाठ करूनि किर्ती केली जगीं । उपमा ते अंगी वाढविली ॥२॥
जनार्दनाचा एक वर्णितो संतांसी । नित्य नामपाठासी अनुसरला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP