प्रसंग दुसरा - पंच महाभूतें-शक्ति
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ॐ अर्ध दीर्घ नासिका सद्गुरु। अग्र चरणीं तीर्थ गोदानीरु। तेहतीस कोटि देवतांचा भारु । दास्यत्व करी ॥१॥
या चहूं शक्तींची भेसळणी जाण । येरयेरांत मिश्रितपण । म्हणोनि अष्टधा लक्षण । संकल्प विकल्पें ॥२॥
पंच महाभूतें सबळ सगुण । त्यांचे हे पंचविस गुण विकारण । त्यामाजी शक्ती घेती अवतरण । कल्पनेसंगें ॥३॥
पंच महदूभूतांचें लक्षण । कवणकवणापासूनि निर्माण । कैसे जोडले पंचविस गुण । स्थूलकारीं मन ॥४॥
हें सांगावें जी सद्गुरुबाबा । तत्त्वीं कैसा शक्तींचा मेळावा । भंगल्या कोणतीचा कोण बोलावा । होय स्वामिया ॥५॥
अहिक्य इच्छा धरूनी ईश्र्वरें । नृपासनीं होता उदार धीरें । घाम आला थेंबाकार एकसरें । त्या नांव जोहार ठेविले ॥६॥
तो जहूंर रातला सोऽहं घोषें । स्तवी सहस्त्र हजार वर्षें । ईश्र्वर म्हणजे मज प्रकट केलें कैसे । म्हणऊनि रोखें पाहिलें ॥७॥
तो जहूंर गळोनि जाला पाणी । फेंस जमावला त्याचिये धरणीं । धूम्र जाला नभाची मांडणी । शेंडा खोड ना दिसे ॥८॥
ऐसें इच्छूनि वायु आकाश । वायूपोटीं तेजाचा प्रकाश । तेजापोटीं आपतेज पृथ्वीचा स्पर्श । तळीं शेष स्थापला ॥९॥
शेषावरी सप्त पाताळ भुवन । सप्त सागर पृथ्वी बैसली घेऊन । अंडें तैसें शोभे मद्भुवन । दृष्टांत दृष्टीं ॥१०॥
उत्तर दक्षिण पूर्व पश्र्चिम । आग्नेय नैॠत्य वायव्य ईशान सम । या अष्टहि दिशा तमाम । रविशशि भ्रमयंती ॥११॥
पळें व तिस घटकांचा नेम । शुद्ध प्रशुद्ध राम विराम । या चहूं प्रहरांत मेघःश्याम । सेवादान मागे ॥१२॥
एका राहाट चातीचें (चक्राचे) आणीवरी । एकचि तंतु कांतनारी । तिरीख मोजूनियां पुंजे करी । चिवट म्हणोनि मिरवी ॥१३॥
चिवट तंतु सुताचा गुंडाळा । आडवा उभा विणला परकळा । तैसा पांचा शक्तींचा एकवळा । महद्भूतें देखिला ॥१४॥
शक्ती पांच महद्भूतें जाण । ऐसी जाली ईश्र्वरापासून । खेळ आरंभावयालागून ।इच्छा इच्छियेली ॥१५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP