प्रसंग पहिला - हिरण्यकश्यप-प्रल्हाद
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
कटकामाजी पिटवी धांडोरा । म्हणे कोणी आठवूं नका ईश्र्वरा । हिरण्यकश्यप हरिभक्तां दरारा । म्हणवित असे ॥३०॥
कोणी चोरोनियां हरिभजन करी । त्याचा उमगूनि शिरच्छेद करी । ऐसा अति नष्ट दुराचारी । पापपणें फुंदत असे ॥३१॥
प्रल्हाद निज भक्त उदार धीरें । प्रेमघोषें डुल्ले नामगजरें । तो हिरण्यकश्यपास कवण्या विचारें । जाला असें तें सांगा ॥३२॥
हिरण्यकश्यपें हिरण्यकश्यपे नानापरिचीं विदानें । रचविली त्या प्रल्हादाकारणें । कयाधूनें विष घातलें निष्ठुरपणें । हिरण्यकश्यपाच्या धाकें ॥३३॥
अग्निदहनीं घातला प्रल्हाद । पर्जन्यवेषें द्रवला गोविंद । हस्तिखालीं लोटला हांसे गदगद । नामघोषें गर्जून ॥३४॥
मग प्रल्हाद रोविला क्षितीं । तीरातुबकांचे भडिमार करिती । जवळ जाऊनियां भोंसकती । प्रल्हाद आनंदमय ॥३५॥
प्रल्हाद बत्तिस लक्षणीं पुतळा । महा सुंदर गोजिरा कोंवळा । सिंधूत लोटला एक वेळा । हरि मच्छरूपें अवतरला ॥३६॥
हातीं टाळ चिपळ्या घागरिया चरणीं । प्रल्हाद घोष करी नगरभुवनीं । तें हिरण्यकश्यपें ऐकोनि कानी । धरा धरा म्हणतसे ॥३७॥
मग धरोनी आणिले प्रल्हादाप्रती । हिरण्यकश्यप म्हणे सांग तुझा सारथ्ज्ञी । येरें दावूं आरंभिली प्रचीति । खांबाकडें पाहिलें ॥३८॥
हिरण्यकश्यपें खांबावरी घातली गदा । मग बाहेर नरसिंह निघाला सुधा । सायंकाळी नखें विदारिलें गोविंदा । जांधेवरी घेऊनियां ॥३९॥
हिरण्यकश्यपाच्या काढूनि अंत्रमाळा । नरसिंह घातल्या आपुल्या गळां । प्रल्हादासारिखा आणिक पुतळा ।
हृदयीं पाहे हिरण्यकश्यपाचे ॥४०॥
ऐसा दृष्टाचे पोटीं सृष्ट निपजला । तेणें बेताळिसां मोक्ष मागितला । हें कवणिया गुणें सद्गुरु बोला शेख महंमद म्हणे ॥४१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP