प्रसंग दुसरा - प्रल्‍हादाची जन्मकथा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



तेव्हां सद्‌गुरु उदार बोलते जाले । तुवां मागें दुष्‍ट सुष्‍ट पुसिलें । या प्रल्‍हादान्यायें पाहिजे वोळखिले । सेव सांगतो जालो ॥४२॥
ऐक कोणे एकें अवसरीं । इंद्र क्रोधायमान जाला हिरण्यकश्यपावरी । धरोनी आणिली त्‍याची स्त्री । दूत पाठवूनियां ॥४३॥
धरोनि आणिली हिरण्यकश्यपाची राणी । तेथें कथा करितां नारदमुनि । ते तिने ऐकिलें श्रवणीं । सहजें सहज ॥४४॥
गरोदर होती ते वेल्‍हाळा । नामश्रवण ऐकिलें गर्भगोळां । प्रसूत जालियां प्रल्‍हाद बाळा । नाम ठेविलें असे ॥४५॥
कथा विसर्जून बोलती नारद । हे स्त्री धाडा नाहीं तरी लागले बाध । मग ते धाडिली शीघ्र सिद्ध । हिरण्यकश्यपाजवळी ॥४६॥
प्रल्‍हाद बोलता चालता जाला । पंडितांपाशी पढों घातला । तेणें ॐ धरूनि ‘म’कार सांडिला । नामघोषी नाचे ॥४७॥
ऐसा हरिनामाचा महिमा थोर । तीर्थांव्रतांसी न कळे पार । ते निज सांडूनियां गव्हार । अनेक भ्रमतील ॥४८॥
स्‍वामी आणिक एक पुसतों वचनीं । तुम्‍ही सांगावें मजलागुनी । बोलिले ते चहूं खाणींची मांडणी । तयांत सज्‍जन असती ॥४९॥
कवण ते सज्‍जन तुज कळलें । तें तूं मज सांग पां वहिले । आतां ऐके सद्‌गुरु बोले । शेख महंमदास ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP