मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग दुसरा| भूषण म्हणजे दुःखाचें कारण प्रसंग दुसरा पंच महाभूतें-शक्ति नर-पद्मिनी लक्षण साधू लक्षण पवित्रापोटीं पवित्र हिरण्यकश्यप-प्रल्हाद प्रल्हादाची जन्मकथा संवेदना-दृष्टांत भूषण म्हणजे दुःखाचें कारण शिष्यानुसंधान-दृष्टांत ज्ञान विज्ञान मांडणी-लक्षण निद्राशक्ति प्रसंग समाप्त प्रसंग दुसरा - भूषण म्हणजे दुःखाचें कारण श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत भूषण म्हणजे दुःखाचें कारण Translation - भाषांतर बंदिस्त अक्षरां तुझीं तूंचि बैसविसी ॥५५॥सुतार नाचवी भूषण घोड्याचें । तैसें मज गुरूनें केले साचें । परि चालकपण असे तुमचें मी अहं मिथ्या असें ॥५६॥स्वामी जें जें द्याल भूषण । तेणें सत्य र्होल माझा अपमान । पहा द्रोणागिरीलागून । कैसें जाले असें ॥५७॥भूषण सकळ विंझळाचा सांठा । धरूनी द्रोणागिरी म्हणवी मोठा । शक्ति लागतां लक्ष्मण बरवंटा । हनुमंते उपडिला ॥५८॥तेज भूषण दिधलें रवि शशि । ते भ्रमण करिती दिननिशीं । भूषण कस्तुरी दिधली मृगासी । तो सायासें वधियेला ॥५९॥यालागीं जनीं भूषणांचा डांगोरा । तो जाणिजे कर्मखोडा बेडा । भावभक्तीचा बोध निवाडा । होऊं नेदी कांहीं ॥६०॥या नाशिवंत शरीराचीं भूषणें । तीं महा दुःखाचीं कारणें । परी ते उंच लाधेच ना ठाणे । नीर मधुर मधुर जैसें ॥६१॥ध्रुवाहूनि उंच पद तुमचें सद्गुरु। ते मज लाधावें जी विघ्नहरु । लोकत्रयीं मानितील जाहीरु । मग ईश्र्वर जैसा अविनाश ॥६२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP