प्रसंग दुसरा - ज्ञान विज्ञान मांडणी-लक्षण
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आतां तूं ऐके हो श्रोता । वोळखे शब्दांची व्यवस्था । कोठें फांको देऊं नको चित्ता । अंतर उल्हासें ॥८३॥
शिष्यां ऐसेंच होतें माझ्या मनीं । जे तुवां पुसावी ज्ञानविज्ञानाची मांडणी । सर्व मेदिनींत असे पाणी । खोदल्याविण न लागे ॥८४॥
मेदिनीसारिखा सद्गुरु दाता । कुदळीसारिखा सवें शिष्य खोदिता । तेथें निज नीराची पूर्णता । उचंबळे हृदयीं ॥८५॥
या चहूं शक्तीच्या चार खाणी । त्यामाजी सगुण अवतरे कूपाराणी । तिहीं खाणींवरी एके वचनी । सांवली कृपेची ॥८६॥
स्वप्न सुषुप्ति तुरिया जाण । जागृति सावध करी निजलेपण । हें तंव कृपेचें लक्षण । परियेसी बापा ॥८७॥
जागृति आणि तुरियापण । हे तंव कृपेचें महिमान । तिहीं शक्तींवरी अवलोकन । मोह पान्हा घाली ॥८८॥
जो मोहाचा येतसे उमाळा । तो जाणिजे कृपेचा कळवळा । पहा चराचरी वेळोवेळां । कुरवाळित असे ॥८९॥
राग हा अविद्येचा असे जाणें । मोहें धांवें ते कृपें ठाणें । हांसे वाटै ते महदेचे कारणें । अनेक अनेक भासे ॥९०॥
शक्ति चैतन्या चेतना करी । महदा ते जाणिजे कारभारी । अविद्या निजवितसे अघोरी ।निद्रेच्या अंगसंगें ॥९१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP