प्रसंग दुसरा - पवित्रापोटीं पवित्र
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
पवित्राचें पोटी पवित्र । हें तंव तुम्ही बोलिलेती उत्तर। त्यांत आडताळा देखिला जाहिर । तो परियेसा पैं ॥२६॥
पाप न करावें ही भल्यांचीं उत्तरें । प्रत्यक्ष शिंदळकी केली पाराशरें । तेथें व्यास कवणिया विचारें । अवतरले स्वामी ॥२७॥
आणिक दासीचे पोटी विदुर । अशुभापासूनि शुभ पवित्र । प्रत्यक्ष चोखामेळा महार । नामघोष करी ॥२८॥
हिरण्यकश्यप महा दुष्ट सृष्टीं । करूं नेदी हरिनामाच्या गोष्टी । नित्य देवांदानवांसी खटपटी । दावा धरूनियां ॥२९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP