प्रसंग दुसरा - नर-पद्मिनी लक्षण
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
नरा-पद्मिनीचें अवतरण । ते कृपा प्रसवली जाण । तेथें अविद्या अवलक्षण । कदा न संचरे ॥१६॥
नरा पद्मिनीचा एक बोध । तेथें कदा न घडे वादवेवाद । घरा आलया सुख पावती सिद्ध । भाव देखोनियां ॥१७॥
पद्मिनी करी नराची सेवा । तंव नर स्मरे अव्यक्त देवा । तेथें कदा न पडेचि हेवा । द्वैताचा परियेसा ॥१८॥
पद्मिनी नराचें एक लक्षण । त्यापासूनि घडे ना अवगुण । पतिव्रता धर्म सगुण । त्या दोहींचा असे ॥१९॥
कृपेसंगें साधूचा अवतार । तो हृदयीं वागवी ईश्र्वर । कदां पडों नेंदी विसर । सोऽहं बोधाचा पैं ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP