पंचम पटल - धर्मरूपयोगविघ्नकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
गार पाण्याने प्रात:स्नान करणे, बाह्य पूजाविधीमध्ये अत्यंत निमग्न होणे, सतत होमहवन करीत राहणे, नेहमी मोक्षमय म्हणजे द्वंद्वरहित स्थितीमध्ये राहणे अर्थात् मानसिकरीत्या आपण मुक्त असून आपणास मोक्ष मिळाला आहे अशा कल्पनेत रममाण होऊन आपण द्वंद्वातीत झालो आहोत असे मानत राहणे म्हणजे त्याची प्रत्यक्ष अनुभूती नसणे; व्रत, उपवास व विविध नियम इत्यादि बंधनात स्वत:ला जखडून घेणे, हट्टाने बलपूर्वक मौन धारण करणे, इंद्रिय निग्रह करणे, ध्येय वस्तूचे जबरदस्तीने ध्यान करणे, मंत्रजपात मन लावणे म्हणजे अमुक मंत्राचा अमुक इतक्या संख्येपर्यन्त काय वाटेल ते झाले; तरी जप झाला पाहिजे असा अट्टाहास करणे, दान देणे, सर्व दिशांमध्ये प्रसिद्धी प्राप्त करणे किंवा प्रसिद्धे व्हावी अशी हाव धरणे; बावडी, विहीर, तलाव, प्रासाद म्हणजे मोठमोठी घरे व बगीचे या गोष्टी व्हाव्यात म्हणून त्यांची कल्पना करणे अर्थात् त्या तयार करण्यात सर्व लक्ष घालणे, यज्ञ करणे, पापक्षय व्हावा म्हणून चान्द्रायण व कृच्छ्रादि व्रते करणे आणि विविध प्रकारच्या तीर्थयात्रा सतत करणे ही सर्व धर्मरूप विघ्ने आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP