पंचम पटल - मणिपूरचक्रविवरणम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
मणिपूर नावाचे तिसरे कमल किंवा चक्र नाभिस्थानात आहे. त्याचा वर्ण सुवर्णासारखा पिवळा आहे. या कमलाला शोभायमान अशा दहा पाकळ्या असून त्यावर ड पासून फ़ पर्यन्त म्हणजे ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ़ हे दहा वर्ण विराजमान झालेले आहेत. या स्थानी म्हणजे या चक्रात सर्व मंगल प्रदान करणारा रुद्र नावाचा सिद्ध व लाकिनी नावाची परम धार्मिक देवी राहते. ( या चक्राची देवता विष्णू आहे असे मानले जाते. )
जो साधक या मणिपूरचक्राचे नेहमी ध्यान करतो त्याला सर्व सिद्धी देणारी पातालसिद्धी प्राप्त होऊन तो निरन्तर सुखी राहतो. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात किंवा इच्छांची पूर्ती अगर सिद्धी होते आणि त्याच्या सर्व दु:खांचा व रोगांचा नाश होतो. हा साधक कालाला ओलांडून पलीकडे जातो व परकाया प्रवेशही करू शकतो.
( जो साधक मणिपूरचक्राचे नेहमी ध्यान करतो ) अशा साधकाला सुवर्ण इत्यादि गोष्टी तयार करण्याची किंवा अशा गोष्टींची निर्मिती करण्याची सिद्धी अगर शक्ती प्राप्त होते. त्याला सिद्धांचे, औषधींचे म्हणजे न दिसणार्या दिव्य औषधींचे किंवा संजीवनीचे आणि निधीचे म्हणजे भूमीत दडलेल्या द्रव्याचे दर्शन होते.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP