पंचम पटल - चतुर्विधयोगकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
योग चार प्रकारचा आहे. मन्त्रयोग, हठयोग, तिसरा लययोग व चौथा राजयोग होय. राजयोग हा द्वैतभावरहित आहे. याचा अर्था असा की, साधन करता करता राजयोग सिद्ध झाला म्हणजे जीव ईश्वरात लय पावतो म्हणजे शिवशक्तीचे ऐक्य होते अर्थात् सर्व द्वैतांचा किंवा द्वैत भावांचा अभाव होतो. या स्थितीत कोणताही बोध शिल्लक राहत नाही.
या चार प्रकारच्या योगांचे साधकही मृदु, मध्य, अधिमात्र व अधिमात्रतम अशा चार प्रकारचे असतात. या साधकांमधील अधिमात्रतम साधक सर्वाधिक श्रेष्ठ असतो; कारत्ण तो भवसागर किंवा संसाररूपी समुद्र ओलांडून पलीकडे जाण्यास समर्थ असतो.
Last Updated : November 11, 2016
TOP