पुनरपि गांधर्व विवाह होऊ लागण्याचा संभव
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वर्णपद्धती व्यक्तिनिष्ठ मानिली असता विवाहात वरवधूयोजनेच्या अडचणी निघून जातात, इत्यादी फ़ायद्याची कलमे मागे क्र. ११५ येथे वर्णिलीच आहेत. हे फ़ायदे केव्हा व्हावयाचे असतील तेव्हा होवोत, परंतु व्यक्तिनिष्ठ गुणांच्या तत्त्वास अनुसरून विवाह होऊ लागले, तर ते गांधर्वविवाहच होती, व कन्याविक्रयाची निंद्य चालही पुष्कळ अंशी कमी होईल यात संशय नाही. आनुवंशिक पद्धतीने नियमित कक्षेच्या आत सर्व कारभार उरकून घ्यावयाचा असतो, यामुळे असमान गुणांच्या वधूवरांचे जुलुमाचे संयोग होण्याची पाळी येते. या संयोगाचे परिणाम घटास्फ़ोट इत्यादी अनिष्ट स्वरूपाचे होण्याचा संभव असतो, तो या नवीन वर्णपद्धतीने बर्या अंशी टळेल एवढे येथे सुचविले असता पुरे होईल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP