वर्णमात्राची गोत्रव्यवस्था सुधारली पाहिजे
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
अस्त; वर्णपद्धतीची व्यक्तिनिष्ठता आमच्या समाजाच्या मनातून निघून गेल्यापासून आजपावेतो किती युगे लोटली असतील याची कल्पना करणे बरेच कठीण - प्राय: अशक्यच होय. अलीकडे कोठे कोठे या कल्पनेचा पुन: प्रादुर्भाव होऊ लागला आहे, तथापि या कल्पना संपूर्ण जनसमाजास मान्य होण्यास अजून पुष्कळच कालावधी लागेल. या कल्पनेच्या फ़ैलावाबरोबर आणखीही एका निराळ्या कल्पनेचा निर्णय समाजाकडून होणे इष्ट आहे.
ही कल्पना वर्णमात्राच्या गोत्रव्यवस्थेबद्दलची होय. या कल्पनेचे स्वरूप सध्याच्या काळी अगदी विपरीत होऊन बसले आहे; म्हणजे नुसत्या बाह्यत: पाळण्याच्या आचारांसंबंधाने पाहू जाता जरी सांप्रतचे स्वरूप कोणास गैर वाटण्याजोगे नसले, तरी स्वाभिमान, देशाभिमान इत्यादी प्रकारच्या उदात्त तत्त्वांचा नाश तिजपासून होतो व झालाही आहे. ही स्थिती बदलून ती उदात्त तत्त्वे सजीव होणे हे वास्तविक विचार करू जाता विशेष इष्ट आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP